मी कुणालाच घाबरत नाही....
नाशिकमध्ये अर्ध्याहुन जास्त मराठा मतदार माझ्या बरोबर -- छगन भुजबळ
येवला : पुढारी वृत्तसेवा
मी कधीच कुणाला घाबरत नाही, मी कुणालाही घाबरून माघार घेतलेली नाही मी मराठा समाजाच्या नाराजीला घाबरून माघार घेतली नाही तर माझ्यामागे नाशिक लोकसभा मतदारसंघातील अडीच लाखावरून जास्त मराठा मतदार तेवढेच ओबीसी मतदार व इतर मागासवर्गीय मुस्लिम मते उच्चभ्रू मते ज्यांना ज्यांना नाशिक चा विकास लागतोय यांच्यासह अनेक जण आहेत, मी सहजच दोन लाखाहून जास्त मतांनी निवडून आलो असतो असा विश्वास मंत्री छगन भुजबळ यांनी येवला भेटीत व्यक्त केला.
एवढ्यातील शिवसृष्टीच्या कामाच्या पाहणीच्या वेळेस ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भुजबळ म्हणाले की
मला नाशिक मधून उमेदवारी करायचे ठरल्यावर एक महिना वाटाघाटीचे गुऱ्हाळ चालले ते मला काही पसंत नव्हते, सगळं काही मान सन्मानाने होत असेल तर ठीक आहे जर माझ्यामुळे वाटाघाटी अडत असतील तर मी म्हटलं ठीक आहे मी बाजूला होतो.