येवला नगरपालिकेकडून प्लास्टिक बंदी बाबत धडक कारवाई
येवला : पुढारी वृत्तसेवा
येवला नगरपरिषद व अखिल भारतीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक बंदी बाबत धडक कारवाई मोहीम हाती घेऊन ची प्लास्टिक बंदी बाबत मंगळवारी धडक कारवाई करुन मोठ्या प्रमाणात सिंगल युज प्लास्टिक जप्त करण्यात आले 23 एप्रिल 2024 रोजी नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्यधिकारी किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. राज्यात प्लास्टिक बंदी असताना देखील येवल्यात मात्र सर्रासपणे प्लास्टिकचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालिका प्रशासनातर्फे सर्रासपणे प्लास्टिकचा वापर करणाऱ्या दुकान मालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. येवला शहरातील विंचूर रोड येथील व्यावसायिकांकडे प्लास्टिक आढळून आल्याने दोन्ही व्यावसायिकांना प्रत्येक 5000 रु दंड आकारण्यात आला. तसेच दुसऱ्यांदा प्लास्टिक आढळल्यास दहा हजार रुपये दंड आणि तिसऱ्यांदा प्लास्टिक आढळल्यास रुपये पंचवीस हजार रुपये सहा महिने कारावास अशी शिक्षा होऊ शकते असे व्यवसायिकांना कळविण्यात आले . यानंतर शहरातील आठवडे बाजारात देखील मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रेते पतविक्रेते यांच्याकडून प्लास्टिक जप्त करण्यात आले सुमारे 52 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. या मोहिमेसाठी उपस्थित स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता रूपाली भालेराव स्वच्छता निरीक्षक सागर झावरे माझी वसुंधरा नोडल अधिकारी गोविंद गवंडे रचना सहाय्यक अमोल पाटील शहर समन्वयक गौरव चुंबळे स्वच्छ भारत अभियान प्रकल्प अधिकारी शितल झावरे संदीप बोडरे आकाश गायकवाड अभिषेक शिरसाठ वैभव जोर्वेकर आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाने सिंगल युज प्लास्टिक वर बंदी आणली असून तरी नागरिकांनी सिंगल युज प्लास्टिकचा वापर करू नये तसेच प्लास्टिकला पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचा वापर करावा. व वसुंधराचे रक्षण करावे
रुपाली भालेराव
स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता
येवला नगरपरिषद येवला