येवला शहर पोलीसांची कारवाई, दुचाकीसह तीन गुन्हयातील मुददेमाल हस्तगत येवला शहरामध्ये कोयत्याचा धाक दाखवून चैन स्नॅचिंग करणारे दोघे आरोपी गजाआड.
येवला : पुढारी वृत्तसेवा
धारदार हत्यार कोयत्याचा धाक दाखवून चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपींना पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एसएनडी कॉलेज जवळील बाभळीच्या काटवनात बाभुळगांव शिवारात पोलीसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून रंगेहाथ पकडले.
येवला शहर पोलीसांनी दि. २९/०३/२०२४ रोजी शुक्रवारी दुपारी २ वा. चे सुमारास काळा मारूती रोडवर एका वयोवृध्द महिलेची गळयातील सोन्याची चैन दोन अज्ञात आरोपीतांनी धारदार हत्यार कोयत्याचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देउन, ओरबाडून घेउन तिला जखमी करून, तिच्या मदतीला येणा-या आजूबाजूच्या लोकांना सुध्दा कोयत्याचा धाक दाखवून दहशत करून चैन हिसकावून घेतले बाबत प्रमिलाबाई कृष्णा नाकोड वय ७१ वर्ष रा येवला यांनी येवला शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यानंतर अनिता राजकुमारी भुसारी वय ५४ रा येवला, यांचे गळयातील सोन्याची चैन दोन अज्ञात चोरटयांनी त्याच पध्दतीने चोरून नेल्याची फिर्याद दिली आहे. तसेच मिना प्रकाश खैरे वय ४३ रा येवला यांनी सुध्दा त्याच पध्दतीने त्यांचे गळयातील सोन्याची चैन दोन अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची फिर्याद दिली आहे. त्यामुळे येवला शहरात दोन्ही आरोपींनी सलग तीन ठिकाणी चैन स्नॅचिंग करून दहशत निर्माण केली होती.
त्यानुसार येवला पोलीसांनी तात्काळ दखल घेउन अज्ञात आरोपींविरोधात भादविक. ३०७, ३९४, ३९७, ३४१, ५०६, ३४ प्रमाणे तीन गन्हे दाखल करून गुन्हयांचा पुढील तपास स्वतःकडे घेउन येवला शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी विलास पुजारी यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि / डी एम लोखंडे यांना दोन पथके तयार करण्याचे आदेश देउन त्यात पोहवा / बोडके, पोहवा/शिंदे, पोना / संदीप पगार, पोशि/गणेश पवार, पोशि / बाबासाहेब पवार, पोशि/आव्हाड, पोशि/दळवी, पोना/गेटे, पोना/हेंबाडे, पोशि/लकडे, यांची दोन पथके तयार करून त्यांना आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून तात्काळ नाकाबंदी लावून खाना केले असता सीसीटीव्ही फुटेज मधील वर्णनाची दोन इसम एक पिवळा शर्ट व एक निळा शर्ट यांना पोलीसांनी ओळखून बाभुळगांव परीसरात मोटार सायकल वरून पळुन जात असतांना दोन किलोमिटर पाठलाग करून सिनेमा स्टाईलने रंगेहाथ पकडले. आरोपींना ताब्यात घेउन विचारपुस केली असता, त्यांनी
त्यांचे नावे १) किरण नवनाथ गायकवाड वय २२रा निवाणी वडगांव ता श्रीरामपुर जि अहमदगनर २) सागर गोरख मांजरे रा कल्याण रोड, शिवाजीनगर, अहमदनगर सध्या रा गाजरे मळा, सिन्नर, ता सिन्नर जिल्हा नाशिक. असे सांगितले. त्यानंतर त्यांचेकडे अधिक विचारपुस करता त्यांनी येवला शहरात काळा मारूती रोड येथे एक ठिकाणी व चंडालीया हॉस्पीटल जवळ दोन ठिकाणी चैन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली त्याप्रमाणे त्यांचेकडून तीन्ही महिलांच्या गळयातील सोन्याची चैनी हस्तगत करण्यात आल्या त्यानंतर त्यांना येवला न्यायालयात उभे करून त्यांची दि. ०१/०४/२०२४ पावेतो पोलीस कस्टडी रिमांड घेतली असून त्यांनी गुन्हा करतांना कोयता वापरल्याची कबुली दिली व लपवून ठेवलेला कोयता त्यांचेकडून हस्तगत केला आहे. सदर गुन्हयात त्यांचे अजून साथीदार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने आरोपीतांकडे तपास सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण विक्रम देशमाने , अपर पोलीस अधिक्षक मालेगाव अनिकेत भारती , उपविभागीय पोलीस अधिकारी, मनमाड बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शना खाली व पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांचे सुचनेनुसार पोहवा बोडके, पोहवा/शिंदे, पोहवा / बाळासाहेब आहेर, पोना / संदीप पगार, पोशि/गणेश पवार, पोशि / बाबासाहेब पवार, पोशि/आव्हाड, पोशि/दळवी, पोना/गेटे, पोना/हेंबाडे, पोशि/लकडे यांचे पथकाने केली .