मुरमी शाळेच्या शिक्षिका सोनाली आळंदीकर यांना साहित्यरत्न पुरस्कार

मुरमी शाळेच्या शिक्षिका सोनाली आळंदीकर यांना साहित्यरत्न पुरस्कार


येवला :  पुढारी वृत्तसेवा

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरमी येथील उपक्रमशील शिक्षिका, नवकवयत्री सोनाली जनार्दन आळंदीकर यांना नुकताच मुबई येथील अष्टपैलू संस्कृती कला अकादमी व मासिक वृत्तपत्र नायप्रभात यांचे वतीने साहित्यक्षेत्रातील दिला जाणारा मानाचा साहित्यरत्न हा राज्यस्तरीय गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.सोनाली आळंदीकर यांनी अनेक प्रकारे कविता लेखन केले असून त्यांच्या चेतन काव्ये या कविता संग्रहाचे प्रकाशन उदगीर येथील ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये करण्यात आले होते तसेच या अगोदर त्यांची आई ही कविता,आई या काव्य संग्रहात पण प्रकाशित झाली होती. त्याचप्रमाणे त्यानी रानगंध,माय मराठी,  आई,उंच माझा झोका या सारख्या अनेक काव्यांचे उत्तम प्रकारे सादरीकरण केले असून श्रोत्यांची वाहवा मिळविली आहे.त्यांच्या या साहित्य क्षेत्रातील यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.मुख्याध्यापक चेतन पाटील, उपक्रमशील शिक्षक देसाई तसेच केंद्राचे प्रभारी  केंद्रप्रमुख सदाशिव पानगव्हाणे आदींनी त्यांचे अभिनदन केले.
सोबत फोटो

 
थोडे नवीन जरा जुने