पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमेचे येवल्यात जोरदार स्वागत



पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमेचे येवल्यात जोरदार स्वागत 

येवला  : पुढारी वृत्तसेवा

 राज्याच्या माजी महिला व बालकल्याण मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सुरू केलेल्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेचे येवल्यात जोरदार स्वागत करण्यात आले . 
याप्रसंगी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विंचूर चौफुली  जेसीबीच्या द्वारे पुष्पवृष्टी करून ढोल ताशांच्या गजरामध्ये स्वागत केले..
यानंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालय येथे त्यांचे स्विय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांनी नामदार भुजबळांच्या वतीने स्वागत केले.  त्यानंतर पंकजाताईंचा ताफा आमदार दराडे बंधू यांच्या निवासस्थानी गेल्यानंतर मुंडे व आ.दराडे यांची कौटुंबिक भेट झाली या ठिकाणी शिवसेना जिल्हा अध्यक्ष कुणाल दराडे, डॉ जाधव,दत्तात्रय वैद्य प्रमोद बोडके, यानंतर ही यात्रा नाशिकच्या दिशेने रवाना झाली
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या नेत्या अमृताताई पवार, जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे, तालुकाध्यक्ष नंदकिशोर शिंदे,नानासाहेब लहरे, शहराध्यक्ष तरंग गुजराती, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस राजू सिंग परदेशी,मनोज दिवटे,प्रमोद बोडके दत्तात्रय सानप, श्रावण दादा जावळे,  गणेश गायकवाड कृष्णा कव्हत, युवराज पाटोळे, सकाहरी लासुरे ,प्रकाश मोरे, संतोष काटे, लक्ष्मण  सूरासे,केदारनाथ वेलांजकर बाळासाहेब सातळकर  इतर पदाधिकारी आदी  मान्यवर उपस्थित होते
थोडे नवीन जरा जुने