येवल्यात राष्ट्रवादीची कार्यकारिणी जाहीर
मतदारसंघ अध्यक्षपदी सुभाष निकम,तालुकाध्यक्षपदी विठ्ठल शेलार तर
योगेश सोनवणेची शहराध्यक्षपदी नियुक्ती
येवला : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार गटाची नव्याने जम्बो कार्यकारणी जाहीर झाली आहे.अनेक जुन्या जाणत्या नवीन चेहऱ्यांना सोबत घेऊन पवार समर्थक एड. माणिकराव शिंदे यांनी ही कार्यकारणी जाहीर करून मोठे संघटन उभे केले आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड,महिला जिल्हाध्यक्ष संगीता पाटील यांच्या अनुमतीने प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.मुंबई महानंदचे सुभाष निकम यांची मतदारसंघ अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे तर पंचायत समितीचे माजी सभापती,ज्येष्ठ नेते विठ्ठल शेलार यांची तालुकाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.माजी आमदार जनार्दन पाटील यांच्या स्नुषा कालिंदी पाटील यांची महिला तालुकाध्यक्षपदी नियुक्ती केली असून व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष योगेश सोनवणे यांची राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जेष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्या रायगड निवासस्थानी आज नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.शरद पवार साहेबांना अनेक शिलेदार सोडून गेल्यानंतर येवल्यात झालेल्या सभेने राज्यात श्री.पवार यांची ताकद दाखविली आहे. यापुढेही हा मतदारसंघ भक्कमपणे एकोप्याने पवारांचा पाठीमागे उभ राहील.येथे राष्ट्रवादी काँग्रेस अधिक बळकट होईल असा विश्वास यावेळी बोलताना माणिकराव शिंदे यांनी व्यक्त केला.
दरम्यान,युवा नेते ऍड.शाहु शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी युवक उपजिल्हाध्यक्षपदी येथील दीपक लाठे तर युवक तालुका कार्याध्यक्षपदी साईनाथ मढवई,उपाध्यक्षपदी अशोक सोमासे,भरत धनगे, सरचिटणीसपदी सचिन कड तर तालुका संघटकपदी भूषण दाभाडे यांची नियुक्ती केली आहे.या पदाधिकाऱ्यांना शेख यांच्या हस्ते नियुक्तीपत्रही प्रदान करण्यात आले.
नवनियुक्त कार्यकारीणी अशी -
■ विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष- सुभाष निकम,कार्याध्यक्ष - अजीज शेख,लासलगाव ४६ गावे अध्यक्ष - अंकुश तासकर,उपाध्याय - संपत जाधव.
येवला तालुकाध्यक्ष - विठ्ठल शेलार,कार्याध्यक्ष - रामदास पवार,उपाध्यक्ष - सुभाष गायकवाड व अनिल शिंदे, सरचिटणीस - दिलीप गांजे, चिटणीस - नंदकुमार दाणे, सहचिटणीस - प्रमोद लभडे, खजिनदार - सुरेश कदम,जिल्हा सहचिटणीस - बाळासाहेब पठारे, येवला शहराध्यक्ष - योगेश सोनवणे,उपाध्यक्ष - राजेंद्र हिरे, चिटणीस - एजाज शेख सरचिटणीस - माजिद अन्सारी,
महिला तालुकाअध्यक्ष - कालिंदी पाटील,महिला शहराध्यक्ष - कल्पना शिंदे,ओबीसी सेल तालुकाध्यक्ष - नारायण मोरे, उपाध्यक्ष - प्रकाश होंडे,व्यापारी शेल शहराध्यक्ष अनिल मुथा.
अल्पसंख्यांक सेल - जिल्हाध्यक्ष अकबर शहा,अल्पसंख्यांक सेल - शहराध्यक्ष निसार शेख,उपशहर अध्यक्ष - अन्सार शेख,महिला शहराध्यक्ष - परवीन मोमीन.