जालन्याच्या लाठीचार्ज निषेधार्थ धुळगाव येथे कडकडीत बंद.

जालन्याच्या लाठीचार्ज निषेधार्थ धुळगाव येथे कडकडीत बंद.

 येवला लासलगाव रस्त्यावर अर्धा तास रास्ता रोको करून केला निषेध.

येवला : पुढारी वृत्तसेवा
जालना जिल्ह्यातील अंतरावली येथे संविधानिक मार्गाने  उपोषण करणाऱ्या मराठा आंदोलकांवर अमानुषपणे लाठी चार्ज करणाऱ्या प्रशासन व शासनाचा राज्यभर जाहीर निषेध होत आहे. आज जिल्हा बंदच्या हाक मध्ये तालुक्यातील धुळगाव येथे बंद करून समाज बांधवांकडून येवला लासलगाव रस्त्यावर रस्ता रोको करण्यात आला. गावातील सर्वच व्यवसाय महत्त्वाच्या संस्था कार्यालय कडकडीत बंद करून घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. तसेच एक मराठा लाख मराठा व लाठी चार्ज करणाऱ्या प्रशासन व राज्य सरकारचा धिक्कार असो अश्या घोषणाबाजी करण्यात आली येवला लासलगाव या रस्त्यावर जवळपास अर्धा तास रास्ता रोको करून घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला यावेळी उपस्थित समाज बांधवांना मराठा महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष पांडुरंग शेळके पाटील तसेच योगेश सोमवंशी सरपंच राजेंद्र गायकवाड सिताराम गायकवाड यांनी जोरदारपणे निषेध नोंदवत भाषणे केली यावेळी माजी चेअरमन दत्तात्रय गायकवाड,मच्छिंद्र गायकवाड,रामेश्वर गायकवाड,विक्रम गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल वाळके, वसंतराव गायकवाड,सोमनाथ गायकवाड,निलेश गायकवाड,राजेंद्र सोनवणे,संतोष गायकवाड सागर महाले वाल्मीक शेळके गणेश गायकवाड, राजू माळी,पांडुरंग गायकवाड, उत्तमराव गायकवाड दत्तू गायकवाड,नवनाथ बाराहते,शंकर मांजरे.आधी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने