औषधांच्या सेवनामुळे होणारे परिणाम व दुष्परिणाम वेळीच ओळखा! डॉ.निष्ठा पाळेजा : मातोश्री फार्मशी महाविद्यालयात राष्ट्रीय फार्माकोव्हीजलन्स आठवडा साजरा



औषधांच्या सेवनामुळे होणारे परिणाम व दुष्परिणाम वेळीच ओळखा!
डॉ.निष्ठा पाळेजा : मातोश्री फार्मशी महाविद्यालयात राष्ट्रीय फार्माकोव्हीजलन्स आठवडा साजरा


येवला : पुढारी वृत्तसेवा

हल्ली बदलत्या जीवनशैलीत आजारांचे प्रमाण वाढले आहे यावर आपण औषधउपचार घेत असतो काही औषधांचे दुष्परिणामही असून
औषधांचे सेवनामुळे होणारे परिणाम व दुष्परिणाम वेळीच ओळखावे असे प्रतिपादन मानवता क्युरी कॅन्सर अँड रिसर्च सेंटरच्या संचालिका डॉ. निष्ठा पाळेजा यांनी केले.
एकलहरे येथील मातोश्री औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया अंतर्गत राष्ट्रीय फार्माकोव्हीजलन्स आठवडा साजरा करण्यात आला.या आठवड्याचा मुख्य उद्देश म्हणजे सार्वजनिक विश्वास वाढवणे हा होता.यांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले.या आठवड्या अंतर्गत महाविद्यालयात पोस्टर कॉम्पिटिशन,क्विझ कॉम्पिटिशन तसेच वकृत्व स्पर्धा घेण्यात आली. सर्व स्पर्धांची महत्त्वाची थीम गोळ्यांचे दुष्परिणाम आणि फार्माकोविजलन्स ही होती.तसेच तृतीय वर्षच्या विद्यार्थ्यांनी लाखलगाव येथे खेळी जीवनाशी या पथनाट्यातून औषधां संबंधित दुष्परिणाम व त्या संबंधित घ्यावयाची काळजी यावर विद्यार्थ्यांनी जनजागृती केली.या सर्व स्पर्धांमधून पोस्टर प्रेसेंटेशन मध्ये आयेशा आलम (प्रथम), अनुजा दराडे (द्वितीय),क्विझ कॉम्पिटिशनमध्ये अंतिम वर्ष (प्रथम) व तृतीय वर्ष (द्वितीय) तसेच वकृत्व स्पर्धेमध्ये साक्षी ढिकले (प्रथम) व तन्वी जाधव (द्वितीय) यांनी यश संपादन केले.
औषधाच्या दुष्परिणामबाबत
तक्रार कशी करावी त्या संबंधित माहिती डॉ.पाळेजा यांनी विद्यार्थ्यांना दिली तसेच फार्मकोविजिलन्स क्षेत्रातील फार्मसीचा विद्यार्थ्यांचा रोल व विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी यावर मार्गदर्शन केले. 
यावेळी महाविदयलयाचे प्राचार्य डॉ.गोकुळ तळेले यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील विविध करियरचे मार्ग तसेच औषध उपचाराबाबत मार्गदर्शन केले. 
संपूर्ण आठवड्यात राबविण्यात आलेल्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना फार्माकोव्हीजलन्स याचे महत्त्व तसेच औषधांबद्दल असणारे गैरसमज याबद्दल शिकायला मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.या कार्यक्रमासाठी  मातोश्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किशोर दराडे व सचिव कुणाल दराडे यांचे मार्गदर्शन लाभले. संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन डॉ. स्वाती संधान,प्रशांत व्यवहारे तसेच विद्यार्थी प्रतिनिधी आदिनाथ काकडे,प्राजक्ता कोकाटे,देविका गोंधळे,दीपक सूर्यवंशी,शेरील मेथिव्स,वेदिका माळोदे,प्रेरणा जाधव,श्रद्धा खोडे यांनी नियोजन केले.
फोटो
लाखलगाव :  पथनाट्यातून औषधांची माहिती समजावताना मातोश्री फार्मसी महाविद्यालयाचे विद्यार्थी.
थोडे नवीन जरा जुने