गणरायाचे येवल्यात जल्लोषात स्वागत


 गणरायाचे येवल्यात जल्लोषात स्वागत

येवला : पुढारी वृत्तसेवा
      'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया' या जयघोषात आणि ढोल ताशाच्या गजरात मंगळवारी घराघरामध्ये तसेच सार्वजनिक गणेश मंडळात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. मंगळवारपासून महाराष्ट्राच्या महाउत्सवाची म्हणजेच गणेशोत्सवाची सुरूवात झाली. गणरायाच्या आगमनासाठी येवला शहरातील बाजारपेठ सजली होती. पूजेसाठी आणि सजावटीच्या विविध वस्तूंचेही दुकाने थाटण्यात आली होती. भक्तीपूर्ण वातावरणाध्ये येवल्यात घरोघरी बाप्पाचे आगमन झालेे. बाप्पाच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तीमय झाल्याचे दिसुन येत होते. आरती, गणपती स्त्रोत, मंत्र असे मंगलदायी वातावरण घरोघरी पाहायला मिळत होते.

      १३६ वर्षांची महान परंपरा असलेला येवला शहरातील धोंडीराम वस्ताद तालीम संघाच्या प्रथम मानाचा गणपतीची मंगळवारी दुपारी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. अडीच तास चाललेल्या या मिरवणुकीत मंडळच्या कार्यकर्त्यांनी लाठीकाठी,काठी व बनाट फिरविणे आदी पारंपरिक मैदानी कसरतींचे दर्शन घडविले. सायंकाळी साडेपाच वाजता मानाच्या श्री गणेशाची विधिवत प्रतिष्ठापणा करण्यात आली. तालीम संघाचे अध्यक्ष राजेंद्र लोणारी,माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर,भोलानाथ लोणारी,राजकुमार कासार,भीमराज नागपुरे,हिरामण पराते,खलील शेख,सतिष देशमुख,मुकुंद पोफळे,चंद्रकांत कासार,दीपक लोणारी,विठ्ठल नागपुरे,सुभाष निकम,सुभाष शेटे,रामेश्वर भांबारे,प्रविण लोणारी,विश्लेस पटेल,राजेंद्र भावसार,सागर लोणारी,चेतन लोणारी,आप्पा काळे,मितेश झोंड,आशिष ठाकूर,पप्पू चांदवडकर,मुकेश पाटोदकर,मन्ना वाडेकर,मनोज लोणारी,प्रशांत पटेल,मुकेश पाटोदकर,खंडू साताळकर,लक्ष्मण गवळी,दत्तात्रय लोणारी आदी मिरवणुकीत सहभागी झाले होते. शहरातील विविध मंडळांच्या वतीने देखील सवाद्य मिरवणूक काढत श्रींची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. 
----
(सोबत फोटो)
थोडे नवीन जरा जुने