जनता विद्यालय अंगणगावला गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप

जनता विद्यालय अंगणगावला गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप

 
येवला : पुढारी वृत्तसेवा

व्यंकटरावजी हिरे नागरी सहकारी पतसंस्था मर्या. येवला व जनता सहकारी बँक लि. येवला यांच्या सौजन्याने जनता विद्यालय अंगणगाव ता. येवला या विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय गणवेश पाठयपुस्तके, वहया घेण्याकरीता विद्यालयास रोख रुपये ५० हजारचा धनादेश देण्यात आला. या साहित्य वाटपाच्या अनुषंगाने या विद्यालयात गरजू विद्याथ्र्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी मराठा विद्या प्रसारक समाजाचे येवला तालुका संचालक नंदकुमार वनकर, शालेय समिती अध्यक्ष प्रभाकर वोराळे, शालेय समिती सदस्य, व्यंकटरावजी हिरे नागरी सहकारी पतसंस्था सचिव जगन्नाथ जाधव उपस्थित होते. यावेळी सरपंच व सदस्य मंडळ अंगणगाव, पोलिस पाटील, अंगणगाव व - पारेगाव येथील ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते . या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान म. वि. प्र. समाजाचे, येवला तालुका संचालक नंदकुमार वनकर यांनी भूषविले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे विद्यालयातर्फे स्वागत व सत्कार करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक  बी.डी. आरोटे यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते गरजु विद्याथ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सुञसंचालन जयश्री दवंगे यांनी केले. आभार प्रदर्शन डी. व्ही. पवार यांनी मानले.
थोडे नवीन जरा जुने