येवला शहर पोलीस स्टेशन स्थलांतराला वाढला विरोध

 





येवला शहर पोलीस स्टेशन स्थलांतराला वाढला विरोध


नव्याने पोलीस स्टेशनला अतिरिक्त पोलीस स्टेशन दर्जा द्यावा.

डॉ. संकेत शिंदे


शहरातील शहर पोलीस स्थानक नवीन इमारतीत हलविण्याचा येवल्यातील नागरिकांचा विरोध वाढला आहे  .   शहर पोलीस स्थानक आहे, त्या ठिकाणीच ठेऊन नवीन इमारतीत अतिरिक्त पोलीस स्थानकाचा दर्जा द्यावा अशी मागणी माजी नगरसेवक डॉ. संकेत शिंदे यांनी केली आहे. या स्थलांतराला नागरिकांसह अनेक संघटनांनी विरोध सुरू केला आहे.

येवले शहरातील पोलीस स्टेशनला ऐतिहासिक वारसा आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सध्याचे पोलीस स्टेशन आहे. या ठिकाणी येण्याकरिता विविध मार्ग आहेत. या पोलीस स्टेशन मुळे शहरात पोलिसांचा राबता 24 तास राहतो. अनेक बँक, पतपेढी, सराफी पेठ, व्यापारी या पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर आहेत, गावात घडलेली छोटीशी घटनाही हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस स्टेशनला कळते. शहरांमध्ये वाद अथवा तणाव निर्माण झाल्यास सर्व अर्थाने सोयीस्कर असे हे सध्याचे पोलीस स्टेशन आहे.
वाढीव शहराचा  विचार करून नव्याने बांधकाम होत असलेले पोलीस स्टेशन हे जुन्या कचेरी रोड परिसरात आहे. शहराच्या अगदी उत्तर बाजूला आहे, पुढे ५० मीटर नंतर लोक वस्ती नाही, अतिशय गजबजलेला परिसर आहे, शहरातील गंगा दरवाजा  भागातील नागरिकांना पोलीस स्टेशनला निवेदन द्यायचे असेल तर संपूर्ण गाव फिरून यावे लागेल . त्यात येवला शहर हे सर्व जातीधर्मीय एकोपा आणि शांततेने नांदणारे गाव आहे, त्यास बाधा येता कामा नये. असेही बोलले जात आहे.

   शहरातील नागरिकांच्या लोकभावनेचा आदर करावा. नव्याने होत असलेल्या पोलीस स्टेशनला अतिरिक्त दर्जा द्यावा आणि मध्यवर्ती ठिकाणावरील पोलीस स्टेशन हे मुख्य पोलीस स्टेशन म्हणूनच राहावे सदर ठिकाणी पोलीस वसाहत या ठिकाणी न होता शहरात इतरत्र जागा उपलब्ध करावी. माझी विविध संघटनेला तसेच नागरिकांना ही विनंती आहे की,  भविष्यातील गोष्टीचा विचार करता पोलीस स्टेशनच्या जागेचे महत्त्व ओळखून आपणही सहभाग घ्यावा, असे आवाहनही डॉ शिंदे यांनी केले आहे.
थोडे नवीन जरा जुने