जैन मुनींच्या हत्येचा भारतीय जैन संघटनाचे शाखा येवला च्या वतीने निषेध
येवला : पुढारी वृत्तसेवा
येवला येधील भारतीय जैन संघटना च्या वतीने कर्नाटकातील हिरकोंडी येथे झालेल्या आचार्य जैनमुनी कामकुमारवांदिनी यांच्या हत्येचा निषेध भारतीय जैन संघटनेच्या वतीने करण्मात आला. संघटनेच्या वतीने दृष्कृत्यात सहभागी असणारे गुन्हेगारावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
येवला शहर पोलिस उप निरिक्षक सुरज मेंढे यांना मागणीचे निवेदन भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष रोशन भंडारी यांच्या हस्ते देण्यात आले. जैन समाज हा शांतीप्रिय असुन हिसक कृत्यात सहभागी नाही. हा समाज स्वाभिमानी असुन जैन मुनींची केलेल्या निघृण हत्येचा निषेध करण्यात आला. अशा घटना भाविष्यत घडु नयेत अशा भावना जैन संघटनेचे वतीने व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी रविन्द्र बाफणा, अमोल सोनी, निखिल समदडिया, प्रणव समदडिया, जितेश जैन, गौतम बाफणा, दिनेश संचेती, विशाल चंडालिया, मयुर बोरा, राहुल शिंगी, आदिसह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.