बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त एरंडगाव येथे आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर
येवला : पुढारी वृत्तसेवा
माजी राज्यमंत्री व प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांचा वाढदिवस नेहमी प्रमाणे आगळावेगळा साजरा करत कडू यांना त्यांच्या कार्यास साजेशी भेट येथील कार्यकर्त्यांनी दिली. एरंडगाव येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातील ७०० विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्य केंद्र मुखेड यांच्या कडून आरोग्य तपासणी करण्यात येऊन गरजू विद्यार्थ्यांना गोळ्या औषधांचे वाटप करण्यात आले व ४५० विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी दिया आय केअर सेंटर मालेगाव यांच्या वतीने करण्यात आली असून दृष्टीदोषाचे निदान झालेल्या विद्यार्थ्यांना चष्म्याचे मोफत वाटप प्रहार संघटने कडून करण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाध्यक्ष शरद शिंदे यांच्या हस्ते झाले आपल्या मनोगतात ते म्हणाले की येवला तालुका प्रहार संघटनेचे काम जिल्ह्यातील सर्वच कार्यकर्त्यांना पथदर्शी असून माझ्यासह जिल्ह्यातील सर्वच प्रहार कार्यकर्त्यांना त्यांच्या कामातून बच्चूभाऊ चा वारसा पुढे नेण्याची प्रेरणा मिळते असे सांगत जिल्हा टीम व स्वतः बच्चूभाऊ त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे असून जनतेनेही निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या अश्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहून आपल्या अडचणी सोडाव्यात.प्रस्ताविक प्राध्यापक लक्ष्मण बारहाते यांनी केलं समारोप पर्यवेक्षक भाऊसाहेब वाघ केला. कार्यक्रमासाठी नाशिक जिल्हा प्रमुख श्री शरद भाऊ शिंदे,उपजिल्हाप्रमुख अमजदभाई पठाण,सोशल मीडिया प्रमुख ज्ञानेश्वर ढोली,येवला तालुका अध्यक्ष हरिभाऊ महाजन,तालुका संघटक किरण भाऊ चरमळ,युवा आघाडी तालुकाध्यक्ष सुनील भाऊ पाचपुते,तालुका उपाध्यक्ष रामभाऊ पाटील नाईकवाडे, गणेश भाऊ बोराडे,श्री भागवत भड,बापूसाहेब शेलार, बाळासाहेब बोराडे,सोमनाथ भुसारे,मेहबूब शेख,संजू भाऊ मेंगाने,भाऊसाहेब आहेर, नेऊरगाव शाखा अध्यक्ष रवींद्र कदम,संदीप कोकाटे,नारायण घोटेकर,जनार्दन गोडसे,एरंडगाव शाखा अध्यक्ष रावसाहेब आहेर,पंकज शेलार,तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मुखेडचे डॉ सुनील लगड वैधकिय अधिकारी डॉ पूजा मेहेर, डॉ ज्योती वाघ,डॉ गणेश ठेगळे,बडॉ वर्षा सूताने यांच्यासह दिया आय केअर मालेगाव चे डॉ अभिजित निकम व त्यांची सर्व टीम व सर्व आशा सेविकांनी परीश्रम घेतले.