भूमीपुत्र समूह व स्वामी विवेकानंद विद्यालयाचा संयुक्त उपक्रम कानडे माय लेकाला अनोखे अभिवादन

भूमीपुत्र समूह व  स्वामी विवेकानंद विद्यालयाचा  संयुक्त उपक्रम

कानडे माय लेकाला अनोखे अभिवादन

एरंडगाव हिरवाईने नटतेय


येवला : पुढारी वृत्तसेवा

भूमिपुत्र मयूर नगरी एरंडगाव वाटसप मध्यम समूह व स्वामी  विवेकानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, एरंडगाव   यांच्या संयुक्त विद्यमाने  प्रतिवर्षी प्रमाणे आज वृक्षारोपण कार्यक्रम एरंडगाव - स्मशानभूमी रस्ता तसेच एरंडगाव चिचोंडी रस्त्यालगत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य लक्ष्मण बारहाते होते.

दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असुन मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, वृक्षारोपणाच्यया जागरुकतेचा अभाव, उदासनिता यामुळे अनियमित व अपुर्ण पर्जन्यमान, भयानक उष्णता, ऑक्सिजनचा अभाव अशा संकटांना तोंड देणे भाग पडत आहे. त्यातच ग्लोबल वार्मिंगचा वाढता धोका, यावर प्रभावीपणे मात करावयाची असल्यास काळाची गरज ओळखुन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. ही बाब ओळखुन येथील भूमिपुत्र मयूर नगरी हा वाटसप मध्यम समूह व माध्यमिक विद्यालय प्रतिवर्षी १५१ वृक्षाचे रोपण करून १००% वृक्षाचे जतन करतात. हे तिसरे वर्ष असून ४५२ वृक्ष आज डोलताना दिसतात. या गावाने परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करुन गावोगावच्या तरुणांपुढे आदर्श ठेवला आहे.  व्यवसायानिमित्त बाहेर गावी असलेले एरंडगाव येथील सर्वभूमीपुत्र एकत्र येत पू. साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली नटवर्य सतीश कानडे आणि मालेगाव सारख्या शहरात हजारो कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. हिराबाई कानडे यांच्या स्मृती दिनी वृक्षारोपणाने अनोखे अभिवादन करीत असतात.  

 सात - आठ फुट उंचीचे वृक्ष आणून त्यांचे रोपण केले. भूमीपुत्रांनी वृक्षांच्या संवर्धनार्थ ट्री गार्ड देउन या उपक्रमात सहभाग नोंदवला. वनसंपदेवर अनेक मानवी कामे अवलंबुन असून तसेच राष्ट्रीय कर्तव्य म्हणुन या मोहिमेत अनेकजण सहभागी झाले. प्राचार्य बारहाते,   सुनील गायकवाड, पर्यवेक्षक भाऊसाहेब वाघ, विपीन ज्ञाने, सविता बोरसे यांनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक संजय मढवई यांनी केले. सूत्रसंचालन शिल्पा सूर्यवंशी यांनी केले. माधुरी सूर्यवंशी यांनी आभार मानले. यावेळी संचालक दिगंबर बाकळे, राधिका बावके, संजय वाबळे, वंदना वरंदळ, दिनेश धात्रक, विलास गोसावी, जयश्री पडोळ, कमलेश पाटील, अनिल गावकर उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने