मणिपूर प्रकरणी येवल्यात मूक मोर्चा



मणिपूर प्रकरणी येवल्यात मूक मोर्चा

येवला  : पुढारी वृत्तसेवा

मणिपूर राज्यात गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार, जाळपोळ, दंगल, सैनिकांवर हल्ले आणि निष्पाप महिला-भगिनींवर खुले आम सुरु असलेल्या अमानवीय अत्याचारांचा धिक्कार करावा तेवढा कमीच आहे. विशेषत निष्पाप महिलांना निर्वस्त्र करून सुरू असलेले सामुहिक अत्याचाराचे प्रकार किळसवाणे आणि संतापजनक आहे. अशा नराधमांना विना विलंब फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणी साठी आज राष्ट्र सेवादल, अंधश्रद्धा निर्मुलन भूमिती, सत्यशोधक कम्युनिष्ठ पक्ष, छात्रभारती आदी पक्ष-संघटनांच्या वतीने मुक मोर्चा काढीत धरणे आंदोलन करण्यात आले.

 गेल्या काही वर्षापासून देशभर महिला आणि अल्पसंख्याकांवर विविध प्रकारचे अत्याचार आहेत. मणिपूर मध्ये तर संपूर्ण देशाला हादरवून सोडणारे अत्याच्यार झाले व होत आहेत. त्या अत्यंत क्रूर प्रकारचा आम्ही जाहीर धिक्कार करतो. त्या देशात महिलांना विविध रूपे देवुन देवी समजले जाते, त्याच देशात महिलांना निर्वस्त्र करून धिंड काढली जाते, ही अत्यंत घृणास्पद गोष्ट आहे. हा विरोधाभास आहे. ज्या नराधमांनी हे कृत्य केले आहे. त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. शिवाय त्या राज्याचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी ताबडतोब राजीनामा घ्यावा आणि  राष्ट्रपतींनी विरेन सिंह यांचे सरकार बडतर्फ करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी.  अशा प्रकारच्या अत्यंत घृणास्पद कृत्याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये म्हणून कठोर पावले उचलावीत, अशी या संघटनांचे कार्यकर्ते यांनी केली.

यावेळी राष्ट्र सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. अर्जुन कोकाटे, भगवान चित्ते, अजीज शेख, दिनकर दाणे,पंडित मढवाई, बाबासाहेब कोकाटे, नवनाथ शिंदे, कानिफनाथ मढवाई, गणेश जाधव, हेमंत पाटील, शिवाजी साताळकर, सलिल पाटील, कल्पना माने, रंजना गाडे, चहाबाई अस्वले आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने