दिव्यांगाना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून समान संधी निर्माण करून देण्याची जबाबदारी सर्वांचीच - डॉ.शेफाली भुजबळ






दिव्यांगाना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून समान संधी निर्माण करून देण्याची जबाबदारी सर्वांचीच - डॉ.शेफाली भुजबळ

दिव्यांग तपासणी शिबिरात २ हजारांहून अधिक दिव्यांग बांधवांची पूर्व तपासणी



येवला : पुढारी वृत्तसेवा

दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना सर्व स्तरात समान संधी निर्माण करून देण्याची जबाबदारी आपणा सर्वांचीच आहे,असे प्रतिपादन मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका डॉ.शेफाली भुजबळ यांनी केले. तर मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी घेतलेला उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नेते अंबादास बनकर यांनी केले.


राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून दिव्यांगजन सहायता योजनेमधून येवला व लासलगाव विधानसभा मतदारसंघातील पूर्व तपासणी केलेल्या दिव्यांग बांधवांना मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधवांसाठी माऊली लॉन्स, येवला येथे पूर्व तपासणी व नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्दघाटन ज्येष्ठ नेते अंबादास बनकर व डॉ.शेफाली भुजबळ यांच्या हस्ते उद्दघाटन संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते.
 

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व डॉ.हेलन केलर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे, तालुका वैद्यकीय अधिकारी शरद कातकाडे, समाजकल्याण विभागाच्या बाके, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला बाजार समितीचे सभापती किसनराव धनगे, मायबोली संस्थेचे प्रा.अर्जुन कोकाटे, माजी जिल्हा परिषद सभापती संजय बनकर, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई,शहराध्यक्ष दिपक लोणारी, माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, बाळासाहेब गुंड, माजी पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, नवनाथ काळे, प्रा.हेमंत पाटील, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, अल्केश कासलीवाल, निवृत्ती चव्हाण, नितीन गायकवाड, शिबिर समन्वयक संतोष खैरनार, पुंडलिक होंडे,प्रकाश बागल, आर्टीफीसिअल लिम्ब्स मन्युफक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील विशेषज्ञ डॉ.के.सी. बेहेरा, डॉ.किरण पावरा, डॉ.गौरी साळुंखे, डॉ.रोहित त्रिवेदी, ग्रामसेवक, आशा वर्कर, मदतनीस यांच्यासह या शिबिरासाठी, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर म्हणाले की, दिव्यांग बांधव हे समाजातून दुर्लक्षित राहू नये यासाठी दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आले आहे. या मंत्रालयाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचे सातत्याने प्रयत्न आहेत. त्यांनी मतदारसंघातील दिव्यांग बांधवांसाठी घेतलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून यामुळे दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी शेफाली भुजबळ म्हणाल्या की, दिव्यांग बांधवाना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांचे सातत्याने प्रयत्न सुरु असून त्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आज केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा दिव्यांग बांधवाना लाभ मिळणार आहे. या दिव्यांग बांधवाना शिक्षण, नोकरी, व्यवसाय, खेळ यासह विविध क्षेत्रात संधी निर्माण करून देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


या दिव्यांग शिबिरास येवला मतदारसंघातील दिव्यांग बांधवांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. शिबिरात सुमारे २ हजारांहून अधिक दिव्यांग बांधवांनी सहभाग नोंदवून पूर्व तपासणी केली. यामध्ये दिव्यांग बांधवाना आवश्यक अपंगत्व प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला,फोटो यासह आवश्यक कागदपत्रे शिबिरात जागेवर उपलब्ध करून देण्यात आले. यासाठी तहसील विभाग व जिल्हा आरोग्य विभाग यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या उद्दघाटन प्रसंगी मायबोली संस्थेच्या मूकबधीर विद्यार्थ्यांनी 'खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे' या गीतावर नृत्य सादर केले. यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे यांनी मनोगत व्यक्त केले. तर आभार स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे यांनी मानले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी समन्वयक संतोष खैरनार यांनी अथक परिश्रम घेतले.
थोडे नवीन जरा जुने