दलित तरुणाच्या हत्येचा निषेध करीत येवल्यात तहसीलदारांना निवेदन



दलित तरुणाच्या हत्येचा निषेध करीत येवल्यात तहसीलदारांना निवेदन

येवला : पुढारी वृत्तसेवा

नांदेड जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कोंढार गावी सामाजिक कार्यकर्ता  अक्षय भालेराव या तरुणाचा जातिय मानसिकतेतून निर्घुन खुन करण्यात आला आहे. गावात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती आणि त्यात अक्षय भालेराव हा तरुण आग्रभागी असल्याने त्याचा राग मनात धरून गावगुंडांनी त्याला ठार केले. तसेच इन्स्टाग्राम,व सोशल मीडियावर विडीयो ठेवून त्याचे समर्थन केले आहे. याचा निषेध करीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आंबेडकर गट) दीपक निकाळजे पक्षाच्या वतीने तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देण्यात आले आहे. मृत अक्षय भालेराव याच्या कुटुंबाला शासनाने तत्काळ आर्थिक मदत करुन या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा सुनावली जावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच दलित शोषित घटकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सरकारने कठोर शिक्षा पावले उचलली पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यावेळी तालुकाध्यक्ष प्रविण संसारे, शहराध्यक्ष नितीन सारवान, ऋषिकेश संसारे, आकाश संसारे, सचिन साळी, योगेश ईर्षे, राकेश संसारे, प्रशांत संसारे, रोहन संसारे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने