अनुलोम संस्थेच्या वतीने हिंदू साम्राज्य दिन पंधरावाडा कार्यक्रम
येवला. : पुढारी वृत्तसेवा
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक होऊन 350 वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने अनुलोम संस्थेच्या वतीने हिंदू साम्राज्य दिन पंधरावाडा कार्यक्रम दिनांक 2 जून पासून सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती बाबासाहेब डमाळे यांनी दिली.
शिवराज्याभिषेकाचा पराक्रम म्हणून अनुलोम संस्थेचे महाराष्ट्राचे प्रमुख व ज्येष्ठ पत्रकार स्वानंदजी ओक यांनी तयार केलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन मुकुंद गंगापूरकर,प्रभाकर झळके व इतर मान्यवरांचे हस्ते आज मर्चंट बँक हॉल येथे संध्याकाळी होणार आहे तर हिंदू साम्राज्य दिन पंधर वाडाची सुरुवात स्वानंदजीओक याच्या व मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकास 350 वर्ष पूर्ण होत असताना महाराष्ट्र शासनासह अनेक राजकीय पक्ष, सामाजिक व शिवप्रेमी संघटना यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.विशेष म्हणजे यावर्षी परदेशात अनेक ठिकाणी हा उत्सव साजरा होणार आहे. दुबई सरकारने प्रथमच आशा कार्यक्रमास परवानगी दिलेली आहे.महाराष्ट्र सरकार प्रत्येक तालुक्याला हा कार्यक्रम शासकीय साजरा करण्याकरिता भरघोस निधी देणार आहे.
अनुलोम ही संस्था उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्य करत आहे.महाराष्ट्राचे काम स्वानंदजी ओक,सुजाता मराठे तर विभागीय काम विक्रांत पाटील व संतोष चव्हाण तर येवला- लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे कामकाज बाबासाहेब डमाळे, जयप्रकाश वाघ व अन्य मंडळी बघत आहे.
येवला- लासलगाव विधानसभा मतदारसंघात हिंदू साम्राज्य पंधरवाडा दिन गावागावात भगव्या ध्वज उभारणे,महाराजांचे पूजन करणे,पुस्तिका वाटप करणे, स्थानिक पातळीवर व्याख्याने,प्रवरचने करणे, शिवप्रेमी,साधुसंत व विविध क्षेत्रात काम करणारे, ज्येष्ठांच्या भेटी घेऊन त्यांचा सन्मान करणे अशाप्रकारे साजरा करणारआहे.अशी माहिती बाबासाहेब डमाळे यांनी दिली.