येवला व्यापारी महासंघातर्फे आषाढी एकादशी निमित्त महाप्रसादाचे वाटप... कोटमगाव येथे भाविकांसाठी 322 किलो साबुदाणाची खिचडी आणि 12000 पाणी पाऊच वाटप....

येवला व्यापारी महासंघातर्फे आषाढी एकादशी निमित्त महाप्रसादाचे वाटप...

कोटमगाव येथे भाविकांसाठी 322 किलो साबुदाणाची खिचडी आणि 12000 पाणी पाऊच वाटप....


येवला : पुढारी वृत्तसेवा 

येवला व्यापारी महासंघातर्फे आषाढी एकादशीनिमित्त महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दिवसभरात भाविकांना सुमारे 322 किलो साबुदाण्याची खिचडी आणि 12000 पाऊच चे वाटप करण्यात आले... येवले तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या प्रति पंढरपूर समजले जाणारे विठ्ठलाचे कोटमगाव येथील विठ्ठल रुक्मिणीचे दर्शनासाठी तालुका व शेजारील तालुक्यातून हजारो वारकरी पायी कोटमगाव येथे येत असतात .
या सर्व वारकरी बांधवांची फराळाची व्यवस्था व्हावी यासाठी येवला व्यापारी महासंघाने देवीचे कोटमगाव येथे सर्व दिंड्यांसाठी साबुदाणा खिचडी तयार करून व पाणी पाऊच देऊन फराळाची व्यवस्था केली होती ....याच उपक्रमासाठी येवला व्यापारी महासंघातील सर्व व्यापारी बांधवांनी भरघोस योगदान दिले.

देवीचे कोटमगाव येथील सरपंच अर्जुन कोटमे सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब लहरे तसेच आमचे मार्गदर्शक शरद आबा लहरे तसेच कोटमगाव येथील ग्रामस्थ यांच्या सहकार्याने व्यापारी महासंघाचा कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पाडला. या कार्यक्रमासाठी व्यापारी महासंघातील ज्येष्ठ व्यापारी तसेच आपल्या तालुक्याचे आमदार व माजी पालकमंत्री छगन भुजबळ ,शहर पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम ,भाजपा नेत्या अमृता ताई पवार....शिवसेना युवा नेते कुणाल दराडे यांनी कार्यक्रमाचे ठिकाणी भेट देऊन कार्यक्रमाचे कौतुक केले व येवला व्यापारी महासंघातर्फे वरील सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला . येवला शहर व तालुक्यातील जनतेची सामाजिक बांधिलकी बाळगत येवले शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केल्याने हा भव्य दिव्य उपक्रम राबवणे शक्य झाले. दिवसभरात हजारो भाविकांनी खिचडीचा लाभ घेतला तसेच या सर्वांना 12000 पाण्याचे पाऊच वाटप करण्यात आले ....शेकडो दिंड्या विठ्ठलाचे कोटमगावचे दिशेने निघालेल्या असताना रस्त्यात त्यांची देवीचे कोटंगाव येथे थोडी विश्रांती घेत महाप्रसादाचा लाभ घेतला... मागील वर्षापेक्षा यावर्षी नियोजन वाढवले असतानाही संपूर्ण वारकऱ्यांना महाप्रसाद वाटण्या मध्ये आम्ही थोडे कमी पडलो... पुढील वर्षी यापेक्षा मोठे नियोजन करून सर्व दिंड्यांना महाप्रसाद वाढता येईल याची व्यवस्था येवला व्यापारी महासंघ तर्फे केली जाईल असे आम्ही आश्वासन देतो ....या कार्यक्रमासाठी येवला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष... उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी व्यापारी महासंघातील सर्व सदस्य यांनी मेहनत घेतली.... केवळ व्हाट्सअप ग्रुप वरून आव्हान करत शेकडो व्यापाऱ्यांनी भरघोस वर्गणी देऊन कार्यक्रमात आपला सहभाग नोंदविला.... अनेक तरुण व्यापारी व ज्येष्ठ व्यापारी यांनी दिवसभर सेवा देत कार्यक्रम यशस्वी केला....


थोडे नवीन जरा जुने