बनकर पाटील पब्लिक स्कूल चा सीबीएसईचा १०० टक्के निकाल तनुश्री सोनवणे तालुक्यात द्वितीय

 बनकर पाटील पब्लिक स्कूल चा सीबीएसईचा १०० टक्के निकाल तनुश्री सोनवणे तालुक्यात द्वितीय


येवला ---


येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, बनकर पाटील पब्लिक स्कूल च्या इ १० वी वर्गाचा सीबीएसई चा निकाल जाहीर झाला. शाळेच्या १० वी च्या पहिल्याच बॅच चा  १००% निकाल लागला असून बनकर पाटील पब्लिक स्कूल ने  उज्ज्वल यशाची पताका फडकावली आहे अशी माहिती बनकर पाटील शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष प्रवीण बनकर यांनी दिली आहे.

इ.१० वी च्या तनुश्री प्रशांत सोनावणे  हिने ८७.५० टक्के गुण मिळवून तालुक्यात द्वितीय व विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला. अनुजा शैलेश खराटे हिने ८६.२० टक्के गुण मिळवून द्वितीय तर ऋतुजा रवींद्र चव्हाण हिने ८३.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. बनकर पाटील पब्लिक स्कूल च्या इ. १० वीच्या पहिल्या बॅचच्या  विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान कामगिरी करत आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन घडवून बनकर पाटील पब्लिक स्कूल मध्ये दर्जेदार शिक्षण मिळत असून त्यावर  शिक्का मोर्तब केले असे मत अध्यक्ष प्रवीण बनकर व्यक्त केले.  परीक्षेला प्रविष्ठित विद्याथ्यांपैकी एकूण ४ विद्यार्थी ८० टक्के पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झाले तर विशेष प्राविण्यासह ०६ विद्यार्थी तर २ विद्यार्थी प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून शाळेचा १०० टक्के निकाल लागला आहे.

विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे सचिव माधव बनकर, माजी सभापती संजय बनकर, अध्यक्ष प्रवीण बनकर, प्राचार्य पंकज निकम आदींनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना प्राचार्य पंकज निकम, रुपाली चव्हाण व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.  




विद्यार्थ्यांच्या मेहनतीला अभिमानास्पद यश आले असून यामागे मार्गदर्शक शिक्षक व पालक यांचे मोठे योगदान आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे व पालकांचे अभिनंदन तसेच शाळेच्या १० वी च्या पहिल्याच बॅचच्या  १००% निकालाबद्द्द्ल सर्वांचे विशेष अभिनंदन.  ...........मार्गदर्शक - जेष्ठ सहकार नेते अंबादासजी बनकर







थोडे नवीन जरा जुने