अजहर शहा यांच्या नावाने येवले शहराला मिळाला पाहिला जिल्हा युवा पुरस्कार
येवला : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक मार्फत सन 2021-22 या वर्षातील युवा पुरस्कारासाठी गत तीन वर्षाच्या कामाचा आधारावर प्राप्त झालेल्या पुरस्काराची छाननी करून सन 2021-22 या वर्षासाठी येवला शहरातील अजहर शहा यांची निवड करण्यात आली सदर पुरस्कार एक मे रोजी शासकीय समारंभात पोलीस परेड ग्राउंड नाशिक येथे पालकमंत्री श्री दादाजी भुसे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले याप्रसंगी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी पोलीस आयुक्त तसेच सर्व शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यावेळी रोख रक्कम दहा हजार,प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह अशा स्वरूपात पुरस्कार प्रदान करण्यात आले नाशिक जिल्ह्यातील पहिले मुस्लिम युवक व येवले शहरातील पहिले युवा पुरस्कार प्राप्त अजहर शहा यांचे सर्वत्र कौतुक अभिनंदन केले जात आहे हा पुरस्कार माझा नव्हे तर माझ्या येवले शहराचा आहे युवा पुरस्कार देऊन शासनाने जो माझा सन्मान केला आहे तो येवले शहराचा सन्मान आहे माझ्या येवले शहरामुळे हा पुरस्कार मला मिळाला आहे हा पुरस्कार मी माझ्या आईला व येवले शहराला समर्पित करतो नेहरू युवा केंद्राचे माजी जिल्हा युवा समन्वयक भगवान गवई राज्य युवा पुरस्कार प्राप्त मनोहर जगताप जिल्हा युवती पुरस्कार प्राप्त अश्विनी जगदाळे साजिद पटेल ज्येष्ठ नेते माणिक भाऊ शिंदे, क्रीडा अधिकारी महेश पाटील आदींचे मार्गदर्शन व सहकार्य मला लाभले असे मनोगत अजहर शहा यांनी यावेळी व्यक्त केले युवा पुरस्कार मिळाल्याबद्दल अविनाश शिंदे,योगेंद्र वाघ,राजेंद्र शेलार,रवींद्र करमासे,विलास पगारे,संतोष विंचू,शहर काजी सलीमुद्दीन मिसबाही,निसार भाई नींबू वाले, फहीम शेख,अकबर शहा, मुख्तार शहा,नदीम सरदार,अब्दुल रहीम चमडे वाले,राहुल लोणारी,नितीन पिंपळे,शाबिस्ता मंसुरी , अकरम शेख, मुकुंद अहीरे, आफिया अन्सारी, निदा शेख, नुसरत शेख,आदींनी अभिनंदन केले