तांत्रिक शिक्षण घेऊन कंपन्या व शासकीय आस्थापनामध्ये नोकरीच्या संधी आमदार किशोर दराडे : येवल्यात आयटीआय कडून युवाशक्ती करिअर मार्गदर्शन मेळावा



तांत्रिक शिक्षण घेऊन कंपन्या व शासकीय आस्थापनामध्ये नोकरीच्या संधी
आमदार किशोर दराडे : येवल्यात आयटीआय कडून युवाशक्ती करिअर मार्गदर्शन मेळावा


येवला  :  पुढारी वृत्तसेवा



आयटीआयसारखे तांत्रिक शिक्षण घेऊन कमी कालावधीत रोजगाराच्या संधी  उपलब्ध होतात.विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षण घेऊन विविध कंपन्या व शासकीय आस्थापनामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेतच पण नोकरीच्या मागे न लागता लघुउद्योग स्थापन करून इतरांनाही  रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात असे प्रतिपादन शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी केले.
येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिर समुपदेशन मेळावा येथील महात्मा फुले नाट्यगृहात नुकताच पडला.यावेळी मार्गदर्शन करतांना श्री.दराडे बोलत होते.तहसीलदार आबा महाजन,जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आय.एम.काकड,गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमृत पहिलवान, संस्थेचे आयएमसी समितीचे अध्यक्ष यती गुजराथी तसेच सदस्य प्रशांत उदावंत,भाजपाचे तालुकाध्यक्ष तरंग गुजराथी,मातोश्रीचे प्राचार्य तुषार भागवत तसेच येथील शासकीय आयटीआयचे प्रभारी प्राचार्य संदीप भदाणे,सचिव प्राचार्य आर.एस. राजपूत,गटनिदेशका शितल धाकराव आदींची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी या अतिथीच्या हस्ते फीत कापून व द्वीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून शासकीय आयटीआय मधील विद्यार्थ्यांना शिबिराद्वारे दहावी व बारावीनंतर विद्यार्थ्यांना कुठल्या-कुठल्या क्षेत्रात करिअरच्या उपलब्ध संधीविषयी मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी विविध ट्रेडच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याने विकसित केलेले विविध प्रोजेक्ट याठिकाणी मांडले होते.त्याची पाहणी करून आमदार दराडे यांनी विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली. 
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी दहावीनंतर व्यवसायाच्या अनेक संधी आहेत.किंबहुना परंतु जपानसारख्या देशातही भारतातील आयटीआय प्रशिक्षित उमेदवारांनी रोजगार उभारले असल्याचे आमदार दराडे म्हणाले.दहावी व बारावीनंतर तंत्रशिक्षणात अनेक पर्याय उपलब्ध असून आयटीआय व तंत्रनिकेतन हे हमखास नोकरी व रोजगार देणारे शिक्षण असल्याने हे उत्तम पर्याय असल्याचे सांगत  शैक्षणिक संधी बाबत मातोश्री पॉलीटेक्निकचे प्राचार्य गितेश गुजराती यांनी मार्गदर्शन केले.शंतनू धर्माधिकारी यांनी विद्यार्थ्यांना दहावी व बारावीनंतर करिअरच्या संधी विषयी मार्गदर्शन केले. शिक्षण,नोकरी व रोजगारात व्यक्तिमत्व विकासाची गरज असून यावरच आपले यश अवलंबून असते असे रूपा गायकवाड यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले.शिकाऊ उमेदवार व अप्रेंटिस संधी बाबत सतीश पवार तसेच परदेशात शिक्षणाच्या संधी बाबत किरण धोंगडे यांनी मार्गदर्शन केले.उद्योजकता व स्वयंरोजगार याबाबतचे राजेंद्र पवार यांनी व्याख्यान दिले,आयटीआयमध्ये राबवण्यात येणारे व्यवसायांबाबत संस्थेच्या गटनिदेशका शितल धाकराव यांनी तर आयटीआय प्रवेशप्रक्रिये बाबत शिल्पनिदेशक अतुल अढावू  यांनी माहिती दिली.प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्राचार्य आर.एस. राजपूत यांनी केले तर सूत्रसंचालन सौ.नारखेडे व श्री.सस्कर यांनी केले.     
फोटो 
येवला : छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिर समुपदेशन मेळाव्याचे उद्घाटन करतांना शिक्षक आमदार किशोर दराडे,प्राचार्य संदीप भदाणे,आर.एस. राजपूत,शितल धाकराव आदी 
येवला : छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन मेळाव्यात प्रोजेक्टची पाहणी करतांना  शिक्षक आमदार किशोर दराडे आदी.
थोडे नवीन जरा जुने