येवल्यात श्री स्वामी समर्थ जेष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन साजरा
येवला : पुढारी वृत्तसेवा
येथील श्री. स्वामी समर्थ जेष्ठ नागरिक संघाचा २३ वा वर्धापन दिन खूप उत्साहात येथील कै.भाऊलाल लोणारी संकुलात साजरा करण्यात आला.यावेळी स्री रोग तज्ञ डॉ.किशोर पहिलवान,सेवानिवृत्त शिक्षक व विनोदी व्याखाते सुर्यकांत मांडवडे यांनी आपल्या व्याख्यानातून जेष्ठामध्ये आनंद पेरण्याचा प्रयत्न केला.
संघांचे अध्यक्ष राजेंद्र आहेर अध्यक्षस्थनी होते.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे डॉ.किशोर पहिलवान, माजी प्रचार्य एल.झेड.वाणी,हास्य कलाकार सुर्यकांत मांडवडे होते.या समारंभात तीन महिन्यात येणारे संघांच्या २२ सभासदांचे वाढदिवस साजरे करण्यात आले.प्रथम श्री साने गुरुजी यांची खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने सुरुवात झाली.डॉ.पहिलवान यांनी आपल्या मनोगतात सुखी,आनंदी व समाधानी कसे राहावे याबद्दल विविध उदाहणे देऊन सभासदांना आपले मार्गदर्शन व अनुभव सांगितले.श्री.मांडवडे यांनी नऊ रस हे प्रत्येकाच्या जीवनात असतात परंतु ते कसे उपयुक्त आहे. त्याबद्दल माहिती देऊन सर्व रसात हास्य,भक्ती रस आत्मसात करून आपले जीवन समाधानी ठेवावे.त्याचप्रमाणे हाताची पाच बोटे याविषयी विविध माहिती देऊन बोटे जीवनात कसे खानाखुणा करून त्यांचे महत्व पटवून दिले.यां व्याख्यानातून सर्व जेष्ट नागरिकांनी हास्य विनोदाचा भरपूर आंनद घेतला.
सामाजिक कार्यकर्ते नारायणमामा शिंदे,अरुण भांडगे,निंबा वाणी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सर्व वाढदिवस सत्कार्थी सभासदांना पुणेरी पगडी, शाल, व मोत्याची माळ घालून,पुष्पगुछ देऊन सभासदांकडून सत्कार करण्यात आला.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष भोलाशेठ लोणारी,माजी प्राचार्य एल. झेड. वाणी यांच्यांतर्फे सुरुची भोजन सर्व सभासदांना देण्यात आले तसेच नारायणमामा शिंदे यांच्यातर्फे कार्यक्रम सुरु होण्याआधी थंड जालजिरा शरबत देण्यात आला.याप्रसंगी ९२ वर्षीय बा. बा. जाधव गुरुजी,८५ वर्षीय एल.झेड.वाणी यांचा वाढदिवसानिमित्त सचिव गोविंदराव खराडे,रंगनाथ खंदारे व दिंगबर कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.उपमहाराष्ट्र केसरी राजेद्न लोणारी यांनी संघांसाठी लोणारी संकुल उपलब्ध करून दिल्याबद्दल संघांचे अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार केला.सुरेख सुत्रांचालन विजय पोंदे यांनी केले.कार्यक्रमास प्रा.गो. तू. पाटील,अनिल तरटे,सुदाम दाणे,प्रकाश शिंदे,सुभाष भालेराव,बाळुशेठ पाटोदाकर,बाळासाहेब देशमुख,शिवाजी खैरे,गोविंदराव खराडे,श्री.वाईकर,दिगंबर कुलकर्णी,कैलास बकरे,सुंदरलाल वाघ,राजेंद्र वडे,प्रदीप परदेशीं,प्राचार्य पवार,राजुशेठ चिंगी,खंदारे,अशोक गायकवाड,आगवान,खैरनार,कैलाश एलगट,सुरजमल करवा,ऍड. गुजराथी,मित्तल,दत्ता पाटील,पगार,नंदलाल भांबारे,डॉ.सुताने,मालपूरे,लोणारी दाजी,राठी,प्रचार्य मधुकर कुलकर्णी आदी उपस्थित होते.विजय पोंदे यांनी आभार मानले.पसायदान घेऊन कार्यक्रमांची सांगता झाली.