आनंद निर्माण करणे हेच खरे जीवनाचे प्रयोजन : प्रा. भालेराव एसएनडी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक समारंभ संपन्न.

आनंद निर्माण करणे हेच खरे जीवनाचे प्रयोजन : प्रा. भालेराव 

एसएनडी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक समारंभ संपन्न.

येवला : पुढारी वृत्तसेवा
आज समाजात भौतिक सुखाचा व शिक्षणाचा स्तर उंचावत असतांनाही माणूस उदासिन, वैफल्यग्रस्त होत आहे. जगतांना आनंद निर्माण करणे हेच खरे जीवनाचे प्रयोजन आहे असे मत कवी प्रा. शिवाजी भालेराव यांनी व्यक्त केले. येवला येथील एस.एन.डी शिक्षणशास्त्र महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते. 
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भालेराव होते.
प्रा. भालेराव पुढे म्हणाले की, सर्वच क्षेत्रात  स्पर्धा आणि आव्हाने आहेत. आपले क्षेत्र निवडतांना आपली आवड अंगी असणाऱ्या क्षमता आणि त्यासाठी आत्मसात करावयाची कौशल्य यांचा काळजीपूर्वक  विचार केल्यास प्रत्येक व्यक्तीला आपल्या ध्येयापर्यत पोहोचता येणे शक्य आहे, असे प्रतिपादन प्रा. भालेराव यांनी केले. 
 येवला येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयात संपन्न झालेल्या विविध स्पर्धांमध्ये विषेश नैपुण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. भागवत भड, डॉ. दादासाहेब मोरे, प्रा. ज्ञानेश्वर थळकर, प्रा. राम कोठावदे, प्रा. कैलास मलीक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. रश्मी जोशी यांनी केले.
सुत्रसंचलन स्वप्नाली राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सुधीर शिंदे यांनी केले.
थोडे नवीन जरा जुने