बोकटेत कालभैरवनाथ यात्रेनिमित्त काँग्रेसचे रक्तदान शिबिर.



बोकटेत कालभैरवनाथ यात्रेनिमित्त काँग्रेसचे रक्तदान शिबिर.

येवला : पुढारी वृत्तसेवा

बोकटे येथे श्री कालभैरवनाथाच्या यात्रेनिमित्त येवला तालुका व शहर कॉंग्रेस कमिटी तर्फे दिनांक १४/०४/२०२४, वार - शुक्रवार रोजी कालभैरवनाथाचे मंदीराचे आवारात सामाजिक बांधिलकीतून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. मागील वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी रक्तदान शिबिराचे आयोजन करतात. काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व भाविकांसह ६५ जणांनी उत्स्फूर्त रक्तदान केले. नवजीवन रक्तपेढी नाशिक यांनी सदर रक्तदात्यांचे रक्त संकलन केले.
     यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्त आंबेडकर यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करून जिल्हा परिषदचे माजी सदस्य महेंद्र काले व बोकटे गावचे सरपंच प्रतापराव दाभाडे यांचे हस्ते रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले. 
       यावेळी तालुकाध्यक्ष ॲड.समीर देशमुख, तालुका कार्याध्यक्ष भाऊराव दाभाडे, राजेंद्र काळे, पोलीस पाटील सुरेशराव दाभाडे, काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, शहराध्यक्ष प्रितम पटणी, राजेंद्र दाभाडे, दुगलगावचे उपसरपंच भालचंद्र त्रिभुवन,भाऊसाहेब कदम, किरण दाभाडे, बापूसाहेब दाभाडे, दुगलगावचे उपसरपंच भालचंद्र त्रिभुवन, संतोष निकम, शिवनाथ खोकले, दिपक साळवे, ग्रामपंचायत सदस्य विलास दाभाडे, पोपट दाभाडे, विजय दाभाडे, कमलेश दाभाडे, संतोष खामकर, संदीप साळुंखे, राहुल लासुरे, श्रावण राजगिरे, विजय परदेशी, सुदाम वाघ, दीपक दाभाडे, प्रतीक खामकर, संतोष दाभाडे,विजय  पठाडे, हरिश्चंद्र पागीरे, नितीन दाभाडे, गणेश जाधव, ज्ञानेश्वर दाभाडे, नरेंद्र पाटील, राकेश चंद्रटिके, दत्तु भोरकडे, गणेश डिकले, ऋषिकेश साळवे, संतोष साळवे, समाधान जाधव, विनोद निकम, नितीन त्रिभुवन, ऋषिकेश सोमासे, संजय चव्हाण, संभाजी निकम, शुभम सोमासे, जयराम कदम, संदीप वाघ, मयुरेशवर काळे, गणेश परदेशी, महेश जाधव, ऋषभ दाभाडे, सुरज खामकर, शिवनाथ दाभाडे, प्रसाद दाभाडे, शुभम दाभाडे, बाबासाहेब सोमासे, समाधान खामकर, मुकुंद दाभाडे, नयन घायवट, राहुल सोमासे, निलेश उंडे, वैष्णवी पवार, महेंद्र साबळे, अजय पगार, महेश भोसले, समाधान पवार, शिव बोरसे, शुभदा आचार्य, दिगंबर केरे, साईनाथ केरे, योगेश आहेर, गोकुळ सोमासे, शुभम शिंदे, आकाश जगताप, आदीसह रक्तदात्यांनी रक्तदान केले.
     रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी तालुका कार्याध्यक्ष भाऊराव दाभाडे, ग्रामपंचायत सदस्य विलास दाभाडे, दिपक साळवे, कमलेश दाभाडे, संतोष निकम, प्रतीक खामकर, नितीन त्रिभुवन आदींसह नवजीवन रक्तपेढीच्या डाॅ.नवले व त्यांचे पथकाने विशेष परिश्रम घेतले.
थोडे नवीन जरा जुने