मुक्ती भूमी स्मारक येवला येथे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी


 मुक्ती भूमी स्मारक येवला येथे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी 

येवला : पुढारी वृत्तसेवा
 स्थानिक प्रशासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी येवला तहसील चे तहसीलदार  प्रमोद हिले , त्याचप्रमाणे नवनियुक्त  तहसीलदार आबा महाजन यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमालिका अर्पण करण्यात आली. यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी आय अनिल भवारी , शहर पोलीस स्टेशनचे एपीआय नितीन खंडागळे , मुक्ती भूमी स्मारकाच्या व्यवस्थापिका तथा संशोधनअधिकारी पल्लवी पगारे , ,येवला नगर परिषदेचे मुख्याधिकारी नागेंद्र मुतगेकर एमको बँकेचे संचालक  सुभाष गांगुर्डे, येवला शहर पोलीस ठाण्याचे गोपनीय प्रमुख चंद्रकांत निर्मळ , आरोग्य विभागाचे अधिकारी,पर्यवेक्षक सिद्धार्थ हिरे, डॉ. भूषण शिनकर
यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अभिवादन करण्यात आले. यावेळी त्रिशरण पंचशील व भीमस्तुती भीमस्मरण सुरक्षारक्षक पंचम साळवे यांनी घेतले. स्थानिक विविध संघटनेचे गोटू भाऊ मांजरे सुमित थोरात , गणेश गवळी, भूषण लागवे ,संतोष राऊळ ,नवनाथ पोळ, वाल्मीक कुमावत ,अविनाश कुकर, सचिन सोनवणे, दीपक लोणारी, आदी  सामाजिक कार्यकर्ते व अशोक केदारे ,समाधान गरुड ,आकाश अहिरे, पंचम साळवे ,भाऊसाहेब पठारे, महेंद्र गरुड ,महेंद्र हिरे, मंगेश साबळे ,सिद्धार्थ त्रिभुवन, युवराज पगारे ,छाया साबळे आणि त्या चंदनशिव नंदा साठे आदी कर्मचारी उपस्थित होते.
स्मारकाकडे हजारोंच्या संख्येने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी ओघ वाढत आहे. त्याप्रमाणे येणाऱ्या अनुयायी यांच्यासाठी मुक्तीभूमी स्मारक येवल्याचे वतीने व स्थानिक प्रशासनाच्या वतीने योग्य त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच स्थानिक पदाधिकारी यांनी मा. महासंचालक, बार्टी यांचे विशेष आभार मानले.
थोडे नवीन जरा जुने