कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल ५०० रू मदत द्या आमदार बच्चु कडू


कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल ५०० रू मदत द्या
आमदार बच्चु कडू

येवला : पुढारी वृत्तसेवा
सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन द्यायला हरकत नाही मात्र त्यासोबतच वयोमानानुसार काम न करू शकणाऱ्या बळीराजाचा विचार होऊन त्यालाही पेन्शन द्यायला हवी असे रोखठोक प्रतीपादन प्रहार संघटनेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री आमदार बच्चु कडू यांनी केले . येवला येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी प्रहार उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तू बोडके जिल्हाध्यक्ष शरद शिंदे जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर येवला तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन उपस्थित होते यावेळी कडू यांनी विविध विषयावर आपली मते व्यक्त केली भुजबळांचा मतदारसंघ म्हणून सभा नाही भुजबळ साहेबांपेक्षा शेतकरी मोठा आहे म्हणून ही सभा आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणारे ३५० रुपये अनुदान कमी असून प्रतिक्विंटल ५०० रुपये अनुदान देण्यात यावे अशी मागणी केल्याची माहिती त्यांनी दिली नाशिकमध्ये राष्ट्रवादीने आपल्या राजीनामाची मागणी केली आहे यावर बोलताना ते म्हणाले की ही मूर्खता आहे म्हणून त्यांची नेहमी सत्ता जाते माझ्यावर दोन दोन गुन्हे आहेत एका गुन्ह्यात दोन वर्षे शिक्षा सुनावली असती तर मी अपात्र ठरलो असतो कायद्यात स्पष्ट म्हटले आहे . 
मंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघात ठाकरेंची सभा आहे यावर बोलताना ते म्हणाले की सभेने वातावरण बदलते असे नाही तसे असते तर बाळासाहेबांच्या सभानाही खूप गर्दी व्हायची मन परिवर्तन होणे गरजेचे आहे वीस वर्षानंतर शिवसेनेची सत्ता आली तुम्ही जनतेच्या संपर्कात राहिले तर फायदा होतो फक्त सभांनी वातावरण बदलत नाही सभा घेतली म्हणून लगेच लोकांनी आमदार बदलून दिला असे होत नाही एवढे लोक आता मूर्ख राहिलेले नाही शिवगर्जनेपेक्षा याची त्याची गर्जना करण्यापेक्षा हा महत्त्वाचे आहे गर्जना करून मंदिरे मज्जिदा बांधून भोंगे काढून कोणाचे पोट भरले का असा सवाल त्यांनी केला सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविले पाहिजे लोकांच्या पोटापानाचे प्रश्न सोडवण्याची गरज आहे.
संजय राऊत यांच्या खासदारकी वर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की कायदा सर्वांसाठी सारखा आहे राहुल गांधी यांच्यावरील कारवाईवर मी सहमत नाही जितक्या तातडीने राहुल गांधी यांच्यावर कारवाई झाली तितक्याच वेगाने सामान्यांचे प्रश्नही सुटले पाहिजे.
सप्टेंबर ऑक्टोबर २०२२ मधील नुकसानीचे पंचनामे होऊनही येवल्यातील १६ हजार शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही यावर बोलताना ते म्हणाले की सरकारने शेतकऱ्यांसाठी १२ हजार कोटींची मदत वाटली आहे.नुकसानीची मर्यादा दुपटीने वाढविली राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मदत वाटप केली आहे येवल्यातील मदतीची काय अडचण आहे,त्यासाठी आम्ही पाठपुरावा करू.असे त्यांनी सांगितले
विषमतेची दरी वाढत चालली असल्याबद्दल खेद व्यक्त करून शासन कर्मचाऱ्याला महिन्याला 18 हजार रुपये खर्च लागत असल्याचे सांगते आणि मग गरिबाला दोन किलो रेशन देऊन कसे चालेल असा सवाल त्यांनी केला. वरीष्ठ पदापासुन शिपाई पदापर्यंत फिक्स पेन्शन ठरवा पण सोबतच शेतकऱ्यांचाही विचार करा अशी मागणी त्यांनी केली.
प्रहार सामाजिक संघटना असूनही शिंदे गटाला सोबत गेल्याचे सामान्य जनतेला पटलेले नाही या प्रश्नावर ते म्हणाले की,मी दिलेला पाठिंबा राजकीय विषय असून माझ्या मतदारसंघाच्या स्थानिक राजकारणाचा विचार करावा लागतो,लढण्यासाठी मजबुती आवश्यक असते त्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. आमची ताकद पाहूनच विधानसभा व निवडणुकांचा निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट स्पष्ट केले शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात पुन्हा मंत्री असाल का या प्रश्नावर मात्र मी सेवक म्हणून कायम दिसेल असे  उत्तर त्यांनी दिले.
थोडे नवीन जरा जुने