विविध कला अविष्काराने एस एन डी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
येवला - पुढारी वृत्तसेवा
प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक कलाकार, अभिनेता, गायक, वक्ता, लेखक, कवी असतो. परंतु हे सर्व गुण सर्वांसमोर व्यासपीठावर कौशल्याने सादर करता येणे अतिशय महत्त्वाचे असते. यासाठी आवश्यक व्यासपीठ मिळण्याचा क्षण म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन.बाभूळगाव येथील एसएनडी इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूलमध्ये विविध कला अविष्काराने वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
मान्यवरांचे स्वागत मेजर जाधव व मेजर पाथरे यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी परेड संचलनाने इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी केले कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती,जननायक बिरसा मुंडा व सरस्वती प्रतिमा पूजनाने झाली. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून निवासी नायब तहसीलदार श्रीमती पंकज मगर, जगदंबा एज्युकेशन सोसायटीचे सचिव लक्ष्मण दराडे, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी समाधान झाल्टे,सुनील पवार , विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे स्वीय सहाय्यक गिरीश गावित, संतोष विंचू ,एमएबीडी कॉलेजचे प्राचार्य कुमार सुरवसे, एसएनडी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य वंदना संचेती, एसएनडी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलच्या प्राचार्या प्राची पटेल, एसएसएमव्ही जूनियर कॉलेजचे प्राचार्य गोरख येवले,मातोश्री आयटीआय कॉलेजचे प्राचार्य तुषार भागवत ,एसएनडी पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य उत्तम जाधव , बीएससी ऍग्री कॉलेजचे प्राचार्य दिनेश कुळधर ,एसएनडी नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य नागराज , बीएचएमएस कॉलेजचे प्राचार्य तसेच प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ श्रीमती डॉ रूपा गायकवाड, एसएनडी कॅम्पसचे स्कूल डायरेक्टर विवेक रुपनर व एसएनडी इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य निलेश शिंदे मंचावर उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत स्वागतगीताने इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी संगीत शिक्षक वैभव बोळीज व सोनवणे यांच्या सोबत सादर केले.यानंतर सर्व मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवरांचा परिचय शिक्षिका रुपाली भगत यांनी करून दिला. मुख्य कार्यक्रमास सुरुवात करण्यापूर्वी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी आंतरशालेय निबंध स्पर्धा, वकृत्व, नृत्य, क्रीडा स्पर्धा तसेच जिल्हास्तरावर विविध स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये अनेक स्तरावर ती विद्यार्थ्यांनी यश संपादन केले त्या सर्व विद्यार्थ्यांचे सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे शाळेमध्ये घेण्यात आलेल्या झी टीव्ही आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे शाळेमध्ये जो क्रीडा सप्ताह घेतला जातो त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हाऊसने सर्वाधिक गुण मिळवून या शैक्षणिक वर्षाचे सन्मानचिन्ह व रोख बक्षीस मिळविले शाळेचे मुख्याध्यापक निलेश शिंदे यांनी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ चा शालेय प्रगतीचा व विविध स्पर्धेतील यशाचा आढावा सादर केला. वार्षिक स्नेहसंमेलनात यावेळी नृत्य अविष्कारामध्ये इयत्ता नर्सरी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. यावेळी एकूण ३४ नृत्य व ३ नाटिका सादर करण्यात आल्या.लहान गटातील चिमुकल्यांनी सादर केलेले नृत्य पालकांच्या विशेष पसंतीस पात्र ठरले. समाज प्रबोधन होईल अशा अनेक विषयांचा समावेश नाटिकाच्या माध्यमातून पालकांसमोर सादर करण्यात आला. गानकोकिळा स्व.लतादीदी यांच्या पुण्यतिथी निमित्त शिक्षिका अन्सारी निज्बत यांनी मेरी आवाज हि मेरी पेहचान है या गीताचे गायन करून लातादिदिच्या पवित्र स्मृतीस श्रद्धांजली व्यक्त केली. तसेच शिक्षिका गौरी चोरगे यांनी स्वतः राधे राधे मेरा लाल या गाण्यावर नृत्याविष्कार सार केला. तसेच माय भवानी, बमबम भोले, मायकल डान्स, आदिवासी नृत्य, राज आल राज आल, कोळी डान्स, आपलीच हवा, केरला वाले, अश्या अनेक नृत्यांची मेजवानी श्रोत्यांसाठी सादर करण्यात आली. या कार्यक्रमाच्या शेवटी सादर केले गेलेले गेली माझी सख्खी बायको गेली हे नृत्य पालकांच्या विशेष पसंतीचे नृत्य ठरले. कार्यक्रमास शाळेचे उप मुख्याध्यापक संदीप पाटील ,साक्षी शेळके राजीव बंड सुभाष सोनवणे निकिता आरगडे योगिता चिनी सागर सूर्यवंशी धनंजय सोनवणे रवींद्र बागुल रूपाली भगत दिलशाद शेख अन्सारी निजबत स्वाती चौधरी, शितल डुमरे, स्नेहाशिष पांडा, हनुमान गिरी, गोविंद बच्छाव, नितीन पोकळे, निलेश भालेराव, गणेश पोळे, दिनेश कुमावत, वैभव बोळीज, शशिकांत सोनवणे, जयेंद्र चव्हाण, ललिता सावकार पूजा ठाकरे, अर्चना राजगुरू, रेखा राऊत ,अँथनी मॅडम ,गौरी चोरगे, सुरेखा अवनकर ,स्वाती बडवल ,अर्चना गांगुर्डे, शिल्पा साळी ,मिनू विश्वान कावेरी गायकवाड, शितल मंडाळे ,मनीषा रोटे, पुष्पा ठाकरे, श्रद्धा गरुड ,गणेश पवार उपस्थित होते सूत्रसंचालन शिक्षिका साक्षी शेळके, कुमारी रुपाली भगत व श्रावणी काळे यांनी केले.
फोटो -