यशाला कोणताही शॉर्टकट नाही- डॉ. पंकज कोकाटे
येवला- पुढारी वृत्तसेवा
यश मिळवायचे असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही. कठोर मेहनत घेतली तर यश पायाशी लोटांगण घालते आणि यशाला कोणताही शॉर्टकट नसतो असे प्रतिपादन पिंपळगाव बसवंत येथील प्रसिद्ध डॉक्टर व एन्झोकेम विद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. पंकज कोकाटे यांनी केले. येथील सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन्झोकेम विद्यालयातील इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप व आशीर्वाद समारंभ कार्यक्रम आज संपन्न झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या प्रतिमापूजनाने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य दिलीप जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नम्रता पोफळघट, अदिती गायकवाड, मोनिका वाबळे, गायत्री सोनवणे, प्रांजली जाधव, पल्लवी पठारे या विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून विद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. उपप्राचार्या शुभांगी खाखरिया, पर्यवेक्षक दत्तकुमार उटवाळे, गुरुजनांपैकी बाळासाहेब हिरे, उत्तम पुंड, राजेंद्र गायकवाड, माधवराव गायकवाड, कैलास धनवटे, कैलास चौधरी, चंपा रणदिवे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेकरिता शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन उत्सवप्रमुख सुहासिनी चित्ते यांनी केले, आभार शीतल शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास विजय साळुंके, कैलास पाटील, अविनाश कुलकर्णी, किशोर सोनवणे, स्वाती सानप, गीताश्री शिंदे, जनार्दन भनगडे, गोविंद सुंबे, सुनील कोटमे, अंकुश गाडेकर सर्व शिक्षक उपस्थित होते.