येवला येथील विश्वलता महाविद्यालयात नायलॉन मांजा याविषयी जनजागृती

येवला येथील विश्वलता महाविद्यालयात नायलॉन मांजा याविषयी जनजागृती


येवला : पुढारी वृत्तसेवा

 स्वच्छ सर्वेक्षण 2023 व माझी वसुंधरा 3.0 अंतर्गत येवला नगरपरिषद येवला व ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट अंतर्गत आज शहरातील विश्व लता कला वाणिज्य विद्यालय येवला येथे  नायलॉन मांजा बाबत जनजागृती करण्यात आली मकर संक्रांत म्हटले की येवला शहरात पतंग उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जात असतो व त्यामध्ये नायलॉन मांजाचा वापर मोठ्या प्रमाणात आढळून आल्याचे दिसून येते परंतु नायलॉन मांजा हा मनुष्यासाठी व इतर पशुपक्षी प्राण्यांसाठी देखील घातक असल्याने जीवित हानी होऊ शकते त्यामुळे येवला नगर परिषदेचे अधिकारी यांनी विश्वालता विद्यालय येथे विद्यार्थ्यां मार्फत जनजागृती करून नायलॉन मांजा खरेदी करू नये तसेच इतरांनाही वापरू देऊ नये याबाबत जनजागृती केले.जर कुणी नायलॉन मांजाची विक्री करत असेल तर तात्काळ नगरपरिषद  आरोग्य विभाग शी संपर्क साधावा व तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील नायलॉन बंदी बाबत पुढे येऊन सहकार्य करावे असे आवाहन येवला नगरपरिषद चे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी केले व तसेच स्वच्छता बाबत याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली व तसेच माझी वसुंधरा 3.0 अंतर्गत विश्व लता महाविद्यालयाचे संस्थापक भूषण लाघवे यांना वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले व महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी उपस्थित स्वच्छता निरीक्षक प्रतीक उंबरे शहर समन्वयक शुभम जाधव संदीप बोढरे अजय घिगे प्राध्यापक अक्षय प्रकाश बळे व सर्व विध्यार्थी आदी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने