भाजयुमो व भाजपा च्या वतीने पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल झरदारी भुट्टो यांचा निषेध
येवला : पुढारी वृत्तसेवा
पाकिस्तान चे परराष्ट्रमंत्री बीलावलभूत्तो झरदारी यांनी आपल्या भारतदेशाबद्दल व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने विंचूर चौफुली येथे सकाळी ११.०० वा झरदारी यांच्या वक्तव्याबद्दल त्याच्या फोटोला जोडे मारून,त्याचा फोटो दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला व पाकिस्तान मुर्दाबाद, नरेंद्र मोदी जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल झरदारी भुट्टो यांनी न्यूयॉर्कमध्ये पत्रकार परिषदेत सर्व मर्यादा ओलांडल्या आणि भारताचे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हिन निंदनीय टीका केली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला घेरण्यात अपयशी ठरलेल्या बिलावल भुट्टो यांनी "गुजरातचा कसाईही जिवंत आहे," असे निंदनीय वक्तव्य केले,त्याचा निषेध करावा तितका कमी आहे. हा भारताचा अपमान आहे.
पाकिस्तान अनेक दशकांपासून सतत दहशतवाद आणि दहशतवादी संघटनांना आश्रय आणि प्रोत्साहन देत आहे.पाकिस्तानची अंतर्गत सुरक्षा आणि आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे आणि तेथे भीषण अंतर्गत संघर्ष आणि जीवघेणी मारामारी होत आहे त्यांनी आपल्या देशाकडे लक्ष द्यावे आम्ही युवा मोर्चातर्फे त्यांचा इतर निषेध करतो.असे विधान युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मयुर मेघराज यांनी केले.
देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा 135 कोटी देशवासीयांना अभिमान आहे. जे भारताला एक समृद्ध, संपन्न आणि शक्तिशाली राष्ट्र म्हणून जागतिक पटलावर सतत ठेवण्याचे काम करत आहेत. बिलावल झरदारी भट्टोचा आम्ही भाजपा येवला शहरातर्फे जाहीर निषेध करतो असे विधान शहराध्यक्ष तरंग गुजराथी यांनी केले.
त्याप्रसंगी जिल्हा कोषाध्यक्ष प्रमोद सस्कर, जिल्हा नेते मनोज दिवटे, कोषाध्यक्ष पुरुषोत्तम रहाणे सर, महिलामोर्चा अध्यक्ष अनुपमा मडे, रत्ना गवळी, उपाअध्यक्ष जितेंद्र करेकर, बाबू खानापुरे, मनोज पैंजणे, हेमचंद्र व्यवहारे आदि कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते