बनकर पाटील पब्लिक स्कुलमध्ये महापरीनिर्वान दिनी महामानवाला अभिवादन.....
येवला : पुढारी वृत्तसेवा
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अंगणगाव येथील बनकर पाटील पब्लिक स्कुलमध्ये ६ डिसेंबर रोजी महापरीनिर्वान दिनानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष प्रवीण बनकर व प्राचार्य पंकज निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला शाळेचे समन्वयक दीपक देशमुख व विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
इयत्ता आठवीतील स्नेहल शिनगर हिने आपल्या भाषणातून बाबासाहेबांच्या बालपणाविषयी माहिती देत त्यांचा शैक्षणिक प्रवास विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. हिंदी शिक्षिका उज्वला माळवदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उपेक्षित समाजासाठी केलेले कार्य, संविधान निर्मितीतील मोलाचा सहभाग, त्यांनी स्थापन केलेली पीपल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गत येणारे औरंगाबादचे मिलिंद व मुंबईचे सिद्धार्थ महाविद्यालय अशी सर्वांगीण माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका दिपाली जाधव तर आभार प्रदर्शन पूजा म्हस्के यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.