मका भावात तफावत आढळल्याने वांधा झाल्याने शेतकऱ्यांनी लिलाव पाडले बंद
येवला : पुढारी वृत्तसेवा
कृषी उत्पन्न बाजार समिती येवला अंतर्गत मका खरेदी सुरू असताना सकाळ-सत्रामध्ये 2029 रुपये प्रति क्विंटल विकली असताना दुपार सत्रात त्याच शेतकर्याची मका 1450चे लिमिट करून 1750 रुपये पुकारण्यात आली. शेतकऱ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर त्याच मकाला पुन्हा 1800 रुपयांचा भाव देण्यात आला . यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मका व्यापाऱ्यांना जाब विचारल्यानंतर वांदा निर्माण झाला. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही अधिक वाद नको म्हणून लिलाव ठिकाणाहून निघून जाण्याचा पसंत केलं . दरम्यान शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत लिलाव बंद केले.
जोपर्यंत मका भावात सुधारणा होत नाही तसेच मका विक्रीचे पेमेंट रोख स्वरूपात मिळत नाही तोपर्यंत लिलाव सुरू होऊ देणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता . दरम्यान मार्केट कमिटीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची बाजू ऐकून घेत लिलाव सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र सायंकाळी पाच वाजेपर्यंत लिलाव सुरू होऊ शकले नाहीत