दिल्ली हत्याकांडात श्रद्धाला न्याय मिळवून देण्यासाठी येवल्यात हिंदुत्ववादी संघटनांचा मूक मोर्चा

दिल्ली हत्याकांडात श्रद्धाला न्याय मिळवून देण्यासाठी येवल्यात हिंदुत्ववादी संघटनांचा मूक मोर्चा

येवला : पुढारी वृत्तसेवा


दिल्ली येथे श्रध्दा वालकर हिची निर्घुणपणे हत्या केली.ही घटना अतिशय सुन्न करणारी आहे,लव्ह जिहाद विरोधी कायदा तात्काळ करावा तसेच धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा यासाठी अशा घटना रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घावा यासाठी नाशिकच्या येवल्यात आज श्रीराम नवमी उत्सव समिती, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्रीय राजपूत करणी सेना अशा विविध
हिंदू संघटनांकडून तहसील कार्यालय मूक मोर्चाचे आयोजन करून  हाताला काळी पट्ट्या बांधून घटनेचा जाहीर निषेध नोंदवला आहे.या मोर्चात महिला व तरुणीचा मोठा सहभाग होता.
 आफताबने दिल्ली येथे श्रध्दा वालकर हिचे ३५ तुकडे करत निर्घुणपणे हत्या केली. हि घटना अतिशय सुन्न करणारी आणि देशभरातील युवतींमध्ये दहशत निर्माण करणारी आहे. या घटनेमधून . एकूणच राज्यात दिवसेंदिवस लव्ह जिहादची समस्या गंभीर रूप धारण करीत आहे.  तरी उपाय म्हणून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लव्ह जिहाद विरोधी कायदा तसेच धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
थोडे नवीन जरा जुने