भुजबळांच्या हस्ते अखंड हरिनाम सप्ताहाच्या ध्वज पूजन
येवला : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था वडगाव बल्हे या संस्थेस राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सदिच्छा भेट दिली. तसेच या ठिकाणी आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या ध्वजाचे पूजन करत ध्वजारोहण केले.
यावेळी तहसिलदार प्रमोद हिले, ज्येष्ठ नेते अरुणमामा थोरात, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, सचिन कळमकर, मोहन शेलार, मकरंद सोनवणे, बाळासाहेब गुंड, संस्थेचे अनिल महाराज जमधडे, सुवर्णाताई जमधडे, भाऊसाहेब महाराज जाधव यांच्यासह भाऊसाहेब धनवटे, सुनील पैठणकर, सुभाष गांगुर्डे, नितीन आहेर, गणेश गवळी, प्रकाश बागल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.