शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना येवल्यात स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
येवला : पुढारी वृत्तसेवा
हिंदुहदय सम्राट सर सेनापती शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना १७ नोव्हेंबर रोजी स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
येवला येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना नेते विधानसभा सहसंपर्कप्रमुख संभाजी राजे पवार शिवसेना जिल्हाप्रमुख कुणाल दराडे उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे झुंजार देशमुख तालुकाप्रमुख रतन बोरनारे यांच्या शुभ हस्ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जय भवानी जय शिवाजी ,अमर रहे अमर रहे बाळासाहेब अमर रहे, जिंदाबाद जिंदाबाद बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद अशा विविध घोषणा देऊन शिवसैनिकांनी बाळासाहेबांचा जयघोष केला .
यावेळी संभाजी राजे पवार यांनी शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून स्मृतिदिनानिमित्त साहेबांच्या आठवणीला उजाळा दिला तसेच येवला तालुक्यामधील शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेला निष्ठावंत शिवसैनिक असून तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी, उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून आगामी निवडणुकीमध्ये शिवसेनेची ताकद दाखवून देऊ असे बोलताना सांगितले.
शिवसेना जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांनी येवला तालुक्यामध्ये सर्व पदाधिकारी बरोबर घेऊन शिवसेनेचा दौरा करणार असल्याचे सांगून गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक निर्माण करून सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन शिवसेनेची ताकद वाढवू , ग्रामीण भागामधील शिवसैनिकांच्या अडी अडचणी समजावून त्यांचे प्रश्न सोडवु व तालुक्यामध्ये शिवसेनेचा झंजावात निर्माण करू असा संकल्प साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त करत असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे झुंजार देशमुख तालुकाप्रमुख रतन बोरनारे युवा सेना तालुकाप्रमुख अरुण शेलार महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख सुमित्रा बोटे किशोर सोनवणे भागिनाथ थोरात चंद्रकांत शिंदे अशोक आव्हाड गणेश पेंढारी अनंत आहेर खंडू साताळकर विकास गायकवाड नितीन दराडे सतीश ठोंबरे राहुल लोणारी गणेश वडनरे सतीश कायस्थ संजय सालमुठे हरिभाऊ साळुंखे मोहफिज अख्तार प्रतीक जाधव मयूर वाळुंज संतोष गोरे किरण ठाकरे नितीन संसारे भोरकडे बाबा किसन बोठे आदी पदाधिकारी उपस्थित होते.