अखिल भारतीय समता परिषदेचा 30 वा वर्धापन दिन निमित्ताने महात्मा फुलेंना विनम्र अभिवादन
येवला : प्रतिनिधी
समता परिषदेचा वर्धापन दिन राज्यात सर्वत्र साजरा होत असून या पार्श्वभूमीवर छगन भुजबळांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यातील नाट्यगृह या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले
ना.भुजबळ यांचे स्विय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे,समता परिषद जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे,प्रदेश प्रसिध्दी प्रमुख संतोष खैरनार,तालुकाध्यक्ष श्री प्रवीण बुल्हे,शहरअध्यक्ष भूषण लाघवे,राष्ट्रवादी शहराध्यक्ष दीपक लोणारी,माजी नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे,माजी नगरसेवक प्रवीण बनकर,माजी शहर अध्यक्ष राजेश भांडगें,विजय खोकले,गोटू मांजरे,नितीन आहेर,प्रवीण पहिलवान,सुमित थोरात,भाऊसाहेब धनवटे,तुषार लोणारी,दीपक पवार, रौफभाई मुलाणी,गणेश गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.