येवला तालुक्यात ७ कोटी ८२ लक्ष निधीतून आठ गावांत होणार नवीन नळ पाणीपुरवठा योजना



येवला तालुक्यात ७ कोटी ८२ लक्ष निधीतून आठ गावांत होणार नवीन नळ पाणीपुरवठा योजना


 
येवला : पुढारी वृत्तसेवा

 राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत येवला तालुक्यातील आठ गावांमध्ये नवीन पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळाली आहे. या नळ पाणीपुरवठा योजनांसाठी ७ कोटी ८२ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.


जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत येवला तालुक्यातील आठ गावांमध्ये जलजीवन योजने अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये येवला तालुक्यातील ठाणगाव नळपाणी पुरवठा योजनेसाठी १ कोटी ४४ लक्ष, पाटोदा नळपाणी पुरवठा योजनेसाठी १ कोटी ७२ लक्ष, विखरणी नळपाणी पुरवठा योजनेसाठी १ कोटी ३३ लक्ष, भारम नळपाणी पुरवठा योजनेसाठी ४१ लक्ष, तळवाडे नळपाणी पुरवठा योजनेसाठी ५७ लक्ष, निळखेडे नळपाणी पुरवठा योजनेसाठी ६४ लक्ष, धानोरे नळपाणी पुरवठा योजनेसाठी ७५ लक्ष, भाटगाव नळपाणी पुरवठा योजनेसाठी ९४ लक्ष रुपये निधीस मंजुरी मिळाली आहे.


येवला तालुक्यात मंजूर झालेल्या या आठ नळपाणी पुरवठा योजनेसाठी एकूण ७ कोटी ८२ लक्ष निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. या नळपाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून या आठ गावातील नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
थोडे नवीन जरा जुने