यज्ञ सुरू असतानाच भगवान शंकराच्या मूर्तीवर अवतरले नागराज
येवला : पुढारी वृत्तसेवा
येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरात सोमवारी कालाष्टमीनिमित्त भाविकांच्या वतीने यज्ञ सुरू होता. दरम्यान हा यज्ञ सुरू असताना एक चमत्कारिक घटना घडली .
भगवान भोले शंकराच्या मूर्तीवर नागराज अवतरले अन या नागराजांनी भगवान शंकराच्या गळ्याला वेडा देऊन तेथे ठाण मांडले.
हा सर्व चमत्कार येथील भाविकांनी पाहिल्यानंतर भाविकांनी कुठलाही आरडाओरडा न करता सर्पमित्राला याबाबत माहिती दिली. सर्पमित्र दीपक सोनवणे यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन या नागराजाला सुरक्षित रित्या जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले . दरम्यान या घटनेची चर्चा परिसरात होताच नागरिकांनी मंदिराच्या दिशेने धाव घेऊन दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाला आहे .