राज राजेश्वर सहस्रार्जुन चौक येथे सहस्रार्जुन भगवान जयंती साजरी
येवला : प्रतिनिधी
राजराजेश्वर सहस्त्रार्जुन भगवान जयंती निमित्त सोमवंशी सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज येथील समाज बांधवांनी सहस्रार्जुन भगवान चौक येथे चौकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
शहरातील पाटील मशीद भागात असलेल्या जोगवाडा येथील सहस्रार्जुन भगवान चौक येथे सहस्रअर्जुन भगवान यांच्या जयंतीनिमित्त फटाक्याच्या आतिषबाजीत आमदार किशोर दराडे व सहस्त्रार्जुन प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन बाकळे यांच्या हस्ते राजराजेश्वर सहस्त्राअर्जुन भगवान की जय घोषणांमध्ये सहस्त्रार्जुन चौक येथे चौकाला पुष्पहार घालण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन युवानेते मयूर मेघराज यांनी केले होते कार्यक्रमाच्या प्रसंगी युवानेते अमोलभाऊ शिंदे, सुनील काटवे, प्रा.ज्ञानेश्वर सांबर, संजय खेरूड, बंडूसा कडतन, नंदू वखारे,रूषी शहारे,जितेंद्र कऱ्हेकर,योगेश शहारे,शेखर सांबर,दादू कुक्कर,परेश भांडगे,आकाश कोकणे, सौरभ बाकळे, सागर मेघराज, सिद्धेश भांडगे,आयुष फणसे व आदी समाज बांधव उपस्थित होते.