भाजपा युवा मोर्चाच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर व धन्यवाद मोदीजी अभियान
येवला : पुढारी वृत्तसेवा
"राष्ट्र नेता ते राष्ट्रपिता" नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा पासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंती पर्यत भारतीय जनता पार्टी चा सेवा पंधरवाडा हा उपक्रम सुरू आहे त्यात अनुषंगाने भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी व जिल्हा संघटक सरचिटणीस
सुनिल बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिर व धन्यवाद मोदीजी अभियान कार्यक्रम येवला येथे संपन्न झाला.
संपूर्ण भारतात भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा पंधरवाडा हा उपक्रम राबवला जात आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंधरवाड्यात विविध प्रकारचे कार्यक्रम देशात व राज्यात घेतले जात आहे त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मयूर मेघराज यांनी भव्य असे रक्तदान शिबिर सहस्रार्जुन महाराज मंगल कार्यालय येवला येथे भरवले होते त्याला प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी साहेब व भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हा संघटक सरचिटणीस सुनीलजी बच्छाव ,जिल्हा नेते संपत नागरे, लोकसभा प्रभारी गणेश ठाकूर, येवला ज्येष्ठनेते धनंजय कुलकर्णी, माजी नगरसेवक सुभाष पैलवान पाटोळे, भाजपा नेते बाबासाहेब ढमाले, नगराध्यक्ष बंडू पैलवान क्षीरसागर, जिल्हा कोषाध्यक्ष प्रमोदजी सस्कर, जिल्हा सरचिटणीस ओ.बी.सी राजूसिंग परदेशी,शहराध्यक्ष तरंग गुजराथी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका संघटक सरचिटणीस प्रा.नानासाहेब लहरे यांनी केले. यावेळी प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी सांगितले देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे भारताला महासत्तेकडे नेण्याचे कार्य करत आहे त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला गेल्या सात वर्षात न्याया देण्याचे काम केले आहे व त्यांच्यानेतृत्वात भारत अधिकाधिक सक्षम बनेल त्यांनी असे कार्यक्रमा वेळी सांगितले तसेच संघटक सरचिटणीस सुनील बच्छाव यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना सांगितले की कोविड सारख्या महामारी देशाच्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी उल्लेखनीय कामगिरी केली त्याबद्दल व २ ऑक्टोंबर ते १५ नोव्हेंबर धन्यवाद मोदीजी या उपक्रमासंदर्भात मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले असून कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद भेटल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले विशेष म्हणजे इथे सेल्फी पॉईंट उपलब्ध करून दिल्यामुळे रक्तदात्यांची संख्या अधिक वाढली असे आयोजकांकडून सांगण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरचिटणीस कुणाल क्षिरसागर, उपाध्यक्ष जितेंद्र कऱ्हेकर, गणेश पवार यांनी अधिक परीश्रम घेतले
सदर कार्यक्रमासाठी संघटक सरचिटणीस बापूसाहेब गाडेकर, भाजपा नेते मनोज दिवटे, सरचिटणीस राधेश्याम परदेशी, पुरुषोत्तम रहाणे ,गणेश गायकवाड,दत्ता सानप,महिला मोर्चा अध्यक्ष अनुपमाताई मढे ,बाळासाहेब साताळकर,सखाहरी लासुरे,संजय जाधव,लक्ष्मण सुराशे, रत्नाताई गवळी, सुरेखाताई भावसार, बाबूशेठ खानापुरे, आयुष फणसे कुणाल भावसार, सिद्धेश भांडगे, अक्षय कुलकर्णी, सिद्धांत वखारे आदी मान्यवर उपस्थित होते.