2 ऑक्टोंबर गांधी जयंती निमित्ताने येवला शहरात स्वच्छता अभियान
स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्र राज्यात येवला शहर 31 व्या स्थानी
कचरामुक्त मानांकन (जीएफसी ) येवला शहराला मूल्यांकनात स्टार मानांकन प्राप्त
येवला : पुढारी वृत्तसेवा
गांधी जयंती निमित्ताने येवला शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. येवला शहरातील भाजी मार्केट परिसरामध्ये स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली यावेळी स्वच्छता कर्मचारी महिला यांच्याकडून श्रीफळ वाढवून स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली यावेळी मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री नागेंद्र मुतकेकर यांनी स्वतः हातात झाडू घेऊन व आपले सर्व कर्मचारी यांना सोबत घेऊन भाजी मार्केट परिसर एकदम स्वच्छ केला यावेळी त्यांनी परिसरातील सर्व नागरिकांना सूचना केल्या की आपला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवावा तसेच प्लास्टिकचा वापर करू नये ओला कचरा व सुका कचरा वेगळा ठेवावा असे यावेळी आव्हान करण्यात आले.
या अभियानास वाढता प्रतिसाद मिळत आहे. घर स्वच्छ राहिले तर गाव स्वच्छ राहिल… गाव स्वच्छ राहिले तर शहर स्वच्छ राहिल... शहर स्वच्छ राहिले तर राज्य स्वच्छ राहिल, पर्यायाने देशही स्वच्छ राहिल. स्वच्छतेमुळे देशाचे आरोग्यही स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे. त्यामुळेच पंतप्रधानांनी २ ऑक्टोबर 2023पर्यंत देश स्वच्छ करण्याचा संकल्प स्वच्छ भारत अभियानातून मांडला आहे. त्यांचा हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी महाराष्ट्राचा हातभारही मोठ्या प्रमाणात लागत आहे. पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत संकल्पाला आता महाराष्ट्राने आणखी व्यापक स्वरुप देण्याचे ठरविले आहे. त्यातूनच आता राज्यातील शहरी भागात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (राबविण्यास सुरूवात होणार आहे.
येत्या पाच वर्षांत भारत हा स्वच्छ देश म्हणून ओळखला जावा, यासाठी केंद्राने राबविलेली योजना महत्त्वपूर्ण आहे. ही योजना यशस्वी होण्यासाठी राज्याचा हातभारही लागणे आवश्यक आहे. त्यासाठीच महाराष्ट्र शासनाने शहरी भागातील स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केले आहे. यापूर्वी महाराष्ट्रात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून यादृष्टीने व्यापक प्रयत्न करण्यात आले आहेत. यापुढील काळातही या अभियानाची व्याप्ती वाढवून संपूर्ण महाराष्ट्र स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे.स्वच्छ महाराष्ट्र अभियान हे त्यातलेच एक पाऊल आहे. या स्वच्छते मोहिमेमध्ये सहभागी झालेले गोविंद गवंडे प्रतीक उंबरे तुषार लोणारी सुनील जाधव उदय परदेशी नितीन लोणारी सदावर्ते साहेब संदिप बोढरे आदी सह इतर कर्मचारी उपस्थित होते.