मुखेडला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची जयंती साजरी

नाशिक जिल्ह्यातील मुखेडला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची जयंती साजरी


बार्टीतर्फे कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्मारकाचा होणार विकास.

येवला :- पुढारी वृत्तसेवा
मुखेड ता.येवला येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची जयंती डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे व मुखेड ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.१५ रोजी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या स्मारकात जयंती साजरी करण्यात आली. डॉ.ए. पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंतीही साजरी करण्यात आली.बार्टीचे मा. महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येवला पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बी.के.आहिरे होते.येवला मुक्तीभूमी स्मारकाच्या व्यवस्थापिका पल्लवी पगारे यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या कार्याची माहिती देतांना सांगितले की कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे खंदे नेतृत्व करणारे कार्यकर्ते होते.मुखेड हे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले गाव आहे.येवला मुक्तीभुमीच्या धर्तीवर मुखेड येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या स्मारकाचा विकास कसा होईल यासाठी बार्टी कटीबद्ध आहे.याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवला जाईल.आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी प्रयत्न केला जाईल.येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर व दादासाहेब गायकवाड यांच्या संघर्षमय जीवन चरित्र संग्रहालय बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली करणार असल्याचे सांगितले.मुखेड ग्रामस्थांच्या वतीने श्री.चंद्रकांत वाघ यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की मा,.ना.छगन भुजबळ माजी उपमुख्यमंत्री मोहदय यांच्या माध्यमातून मुखेडला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे सण२००९ रोजी स्मारक उभे राहिले आहे.महाराष्ट्रातून लोक येथे भेट देतात.परंतु सध्या स्मारकाची दयनीय अवस्था झाल्याचे बघून पर्यटका व संशोधक अभ्यासक नाराजी व्यक्त करतात.बार्टी तर्फे स्मारकाचा विकास झाला पाहिजे.तसेच विद्युत व्यवस्था,पाणीपुरवठा, भव्य वाचनालय, अभ्यासिका,संरक्षण भिंत, सुरक्षा व्यवस्था,बागबगीचा सुशोभीकरण, युवागट, कौशल्य विकास प्रशिक्षण आदी विविध योजना येथे राबवून बार्टीने पुनर्वसन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.कार्यक्रमासाठी बार्टी प्रकाशन विभागाचे रामदास लोखंडे,पं.स.विस्तार अधिकारी बी.के.आहिरे,येवला मुक्तीभूमी स्मारकाच्या व्यवस्थापिका तथा संशोधन अधिकारी श्रीमती. पल्लवी पगारे,सरपंच श्रीमती.पुष्पाताई वाघ, ग्रामसेवक सी.के.मुंडे,ग्रामपंचायत सदस्य अर्जुन भवर,सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वाघ,सिद्धार्थ हिरे,युवराज पगारे,समतादुत चंद्रकांत इंगळे,श्रीधर वाघ,मल्हारी उबाळे,दिवाकर घोडेराव,रावसाहेब आहेर,जयश्री वाघ,सुरेश वाघ,वाळुबा भवर, साहेबराव जगताप,चांगदेव वाघ,पंजाब वाघ,मनोहर वाघ,नवनाथ कंक,मनोहर वाघ,बाळू भवर आदींसह  ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचम साळवे यांनी केले.


प्रतिक्रिया-

 मुखेड येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे स्मारक हे समाजकल्याण आयुक्तालय पुणे व सहा.आयुक्त, नाशिक यांच्या स्वाधीन आहे.बार्टीकडे स्मारक सुपुर्द करावे अशी मागणी आम्ही केली आहे.सध्या गायकवाड स्मारकास डागडुजी करून बार्टीच्या माध्यमातून कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आहे.भविष्यात स्मारकाचा विकास टप्प्याटप्प्याने होईल.महाराष्ट्रातील सर्व स्मारके भविष्यात बार्टी ताब्यात घेवून संगोपन करणार आहे.-

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,बार्टी महासंचालक मा.धम्मज्योती गजभिये.


फोटोखाली - मुखेड येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची जयंती साजरी करतांना बार्टीचे व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी.
थोडे नवीन जरा जुने