बाबासाहेबांनी दाखवलेला धम्म सहिष्णता आणि बंधुभाव शिकवणारा ; अंजलीताई आंबेडकर

बाबासाहेबांनी दाखवलेला धम्म सहिष्णता आणि बंधुभाव शिकवणारा ; अंजलीताई आंबेडकर

येवला : पुढारी वृत्तसेवा

दिनांक 13 ऑक्टोबर गुरुवार रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला या ऐतिहासिक भूमीमध्ये धर्मांतराची घोषणा केली होती या घोषणेला आज 87 वर्ष पूर्ण झाले असून
धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी नऊ वाजता विंचूर चौफुली ते मुक्ती भूमी स्मारक अशी समता रॅली आयोजित करण्यात आली होती. 
या रॅली ची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वंशज अंजलीताई आंबेडकर यांच्या उपस्थित करण्यात आली.
विंचूर चौफुली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच अभिवादन करून कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली.
मुक्ती भूमी स्मारक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शनाचे उद्घाटन देखील याप्रसंगी संपन्न झाले
याप्रसंगी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी येवल्यामध्ये दाखल झाले होते.
मुक्ती भूमी स्मारक या ठिकाणी यात्रेचे स्वरूप पाहायला मिळाले . कोरोना कालखंडानंतर दोन वर्ष अभिवादनाचा कार्यक्रम हा शासकीय पद्धतीने घेण्यात आला होता मात्र शासनाने सर्व निर्बंध उठवल्यानंतर भीम अनुयायांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती . 
याप्रसंगी पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे,तहसीलदार प्रमोद हिले, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे येथील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


फोटो 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना  अंजलीताई आंबेडकर 
थोडे नवीन जरा जुने