धावत्या दुचाकी मध्ये नागोबाचा थरार
येवला : पुढारी वृत्तसेवा
येवल्यात धावत्या मोटरसायकल वर नागोबा स्वार झाल्याची घटना घडली असून सर्पमित्रांने विषारी इंडियन कोब्रा नागास या गाडीतून बाजुला काढून टाकाले.
शनिवारी दिनांक 1 ऑक्टोबर रोजी दुपारची 2 वाजेच्या दरम्यान
येवला शहरातील उद्योजक विशाल देटके हे आपली पल्सर मोटरसायकल घेऊन कोटमगावच्या दिशेने जात असताना अचानकपणे गंगा दरवाजा भागात एचडीएफसी बँकेच्या समोर त्यांना आपल्या पल्सर मोटरसायकलच्या इंडिकेटर जवळ सापाचा फूस्करण्याचा आवाज त्यांना ऐकायला आला,
आणि त्यांच वेळी धावत्या मोटरसायकलवर नागोबाणे फना वर काढल्याने याप्रसंगी मोटरसायकल चालक विशाल देटके यांची भंबेरी उडाली. प्रसंगावधान राखून त्यांनी मोटरसायकलचा वेग कमी करून धावत्या मोटरसायकल वरून उडी घेत विशाल ने आपला स्वतःचा जीव वाचवला.
त्याच क्षणी लोकांच्या हा प्रकार लक्षात आला नाही, मात्र
यावेळी मोटरसायकल चालकाने आरडाओरडा केल्यानंतर तात्काळ येवल्यातील प्रसिद्ध सर्पमित्र दीपक सोनवणे यांना घटनास्थळी बोलविण्यात आले
सर्प मित्र सोनवणे यांनी अत्यंत शिताफीने विषारी इंडियन कोब्रा नागास मोटर सायकलच्या मधून बाजूला केले .