भुजबळ यांनी घेतले येवल्यातील जगदंबा देवस्थान कोटमगाव येथील आई जगदंबा देवीचे दर्शन
येवला : पुढारी वृत्तसेवा
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज येवल्यातील जगदंबा देवस्थान कोटमगाव येथील आई जगदंबा देवीचे दर्शन घेतले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की २००४ पासून मी या ठिकाणी येत आहे. या परिसराचा आम्ही मोठ्या प्रमाणात विकास कामे केली.येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून विविध विकासकामे याठिकाणी करण्यात आली आहेत. आज याठिकाणी आल्यावर आई जगदंबा देवीचे दर्शन घेतले. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर संकटातून बाहेर काढ आणि राज्यातील जनतेला सुखी ठेव अशी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले.
कोटमगाव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे आणि ट्रस्टचे सर्व विश्वस्त त्याचप्रमाणे गावच्या सरपंच संध्या अर्जुन कोटमे यांनी छगन भुजबळ यांचे स्वागत केले आणि ग्रामस्थांच्या तसेच आलेल्या भाविकांच्या वतीने या भागाच्या केलेल्या विकासकामाबद्दल आभार मानले.