केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली साधूमहाराजांची ऑनलाईन फसवणूक.... बँक खात्याची माहिती घेऊन १ लाख ४४ हजार रुपये काढले

केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली साधूमहाराजांची ऑनलाईन फसवणूक....
बँक खात्याची माहिती घेऊन १ लाख ४४ हजार रुपये काढले


येवला : पुढारी वृत्तसेवा

 केवायसी अपडेट करण्यासाठी बँकेच्या खात्याचे  पासबुक, पॅनकार्ड,एटीएम कार्ड याची माहिती घेऊन ऑनलाइन ठकबाजांनी येवला तालुक्यातील गवंडगाव येथील नारायणगिरी महाराज आश्रमाचे गोपालनंदन गुरुरामगिरी महाराज यांना तब्बल १ लाख ४४ हजार रुपयांना गंडवले आहे. या साधू महाराज यांचे बँक खात्याचे डिटेल घेऊन त्यांच्या खात्यातून विविध मार्गाने ही रक्कम ऑनलाइन ठकबाजांनी लंपास केली आहे.
गोपालनंदन महाराजांनी सायबर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनंतर तालुका पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता.१५) गुन्हा दाखल झाला आहे.त्यांचे अंदरसुल येथील बँक ऑफ बडोदा शाखेत बँक खाते असुन याच खात्याला त्यांनी आँनलाईन व्यवहारासाठी यु.पी.आय. फोन पे, पेटीएमचा मोबाइल क्रमांक कार्यान्वित केलेला आहे.४ सप्टेंबरला आश्रमात असतांना त्यांच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून फोन आला.त्यावरील व्यक्तीने बॅक ऑफ बडोदाच्या मेन ऑफीस मुंबई येथुन बोलत असल्याचे सांगत बँक खात्याचे केवायसी अपडेट करा अन्यथा खाते कायमस्वरूपी बंद होईल असे सांगितले.खाते चालु ठेवायचे असेल तर पासबुक,आधारकार्ड, पॅनकार्ड,ए.टी.एम कार्ड अशी माहीती मागितली.बँक खाते बंद होईल या भितीने महाराजांनी त्यांना ही माहीती दिली. तब्यत बरी नसल्याने महाराज औषध घेवून आश्रमात झोपी गेले.
मात्र दुसऱ्या दिवशी त्यांच्या खात्यातुन बरेच यु.पी.आय. ऑनलाईन ट्रान्झेक्शन झाल्याचे मेसेज आलेले होते.त्यांनी अंदरसूल येथे जावुन बँकेत घडलेला प्रकार सांगितल्यावर ऑनलाईन फसवणुक झाल्याचे त्यांना समजले.
या दोन दिवसांत त्यांच्या खात्यातुन पेटीएम,कॅश फ्रि पेयु मनी,टोरासेस अशा ऑनलाईन यु.पी.आय साईटवर वेगवेगळे ऑनलाईन ट्रान्झेशन होवुन १ लाख ४४ हजार ३९७ रुपयांचा ऑनलाईन अपहार झाला आहे.याप्रकारणी गोपाल नंदन महाराजांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक अनिल भावारी अधिक तपास करत आहेत.


● पिंपरीत आढळला महिलेचा मृतदेह!
पिंपरी शिवारात पालखेड डावा कालवा पाटाच्या पाण्यात अनोळखी बेवारस मयत स्त्रीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सापडला आहे.कमरेला लाल रंगाची निकर व परकरची नाडी तसेच आंबा चॉकलेटी रंगाचा साडीचा तुकडा अशा अवस्थेत कुजलेला हा मृतदेह आढळून आला आहे.वय ३५ ते ४० वर्ष असुन मृतदेह पाण्यात वाहत असताना मिळुन आले असुन,कुजलेले आहे.महीलेचे नावागावाचा व वारसाबाबत माहीती असल्यास तालुका पोलीस ठाण्याला (मोबा - ९९२३१४३३९६) माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
थोडे नवीन जरा जुने