आनंदासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर कला,छंद जोपासावे!
एस.एन.डी.अभियांत्रिकी महाविद्यालयात आर्ट अॅण्ड क्राफ्ट क्लबचे उद्घाटन
येवला : पुढारी वृत्तसेवा
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अभ्यास गरजेचा आहेच पण मनःशांती,अभ्यासाकडे मन वाळविण्यासाठी आणि आनंदासाठी
विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर कला गुणांना वाव दिला पाहिजे,छंद जोपासले पाहिजे असे प्रतिपादन एस.एन.डी.अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एम.यादव
यांनी केले.
बाभुळगांव येथील एस.एन.डी. अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशॊधन केंद्रामार्फत महाविद्यालयामध्ये आर्ट अॅण्ड क्राफ्ट क्लबचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यादव बोलत होते या निमित्ताने कॅम्पस फोटोग्राफी स्पर्धा आयोजित केली होती.सदर स्पर्धेत विविध शाखेच्या ७० विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसरातील नैसर्गिक सौंदर्य,फुले झाडे,इमारत आदी फोटो आपल्या कौशल्याने काढून सादर केले. विद्यार्थ्यांचीही कला व कौशल्याचे यावेळी सर्वांनी कौतुक केले.शिवाय महाविद्यालय परिसरातील अनेक देखण्या वास्तू व प्रसंग विद्यार्थ्यांनी टिपले.महाविद्यालयाने राबविलेल्या उपक्रमाचे विद्यार्थ्यांनीही कौतुक केले.प्राचार्य यादव व प्राध्यापकांनी सर्व विद्यार्थ्यांची ही कलाकुसर पाहून त्यांना शुभेच्छा देत मार्गदर्शनही केले.
यावेळी महाविद्यालयाचे समन्वयक प्रा.महेश देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.
विभागप्रमुख डॉ.उबेद अन्सारी,डॉ.पवन टापरे,डॉ.उमेश पवार,एमबीए विभागप्रमुख डॉ.व्ही.एन.उबाळे, डॉ.पुंडलीक पाटील,पी.पी. रोकडे,डॉ.व्ही. एस.चौधरी,अकॅडेमिक डीन प्रा.ए.पी. घोडके तसेच प्राध्यापक व १८० विद्यार्थी उपस्थित होते.प्रा.एस.एम.गोत्रज, प्रा.ए.जे. मिश्रा, प्रा.व्ही.एच.पोकळे,प्रा. समीक्षा गोवलकर,प्रा.एस. एन.ठोंबरे यांनी आयोजन केले.संस्थेचे संचालक रुपेशभाऊ यांनी आर्ट अॅण्ड क्राफ्ट क्लब उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
बाभूळगाव : एस.एन.डी.अभियांत्रिकी महाविद्यालयात आर्ट अॅण्ड क्राफ्ट क्लबच्या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांचे चित्र पाहताना प्राचार्य डॉ.डी.एम.यादव तसेच विभाग प्रमुख व प्राध्यापक.