विद्या इंटरनॅशनल स्कूलचा खेळाडू लक्ष गुजराथी याला पुणे येथील टेनिस स्पर्धेत एकेरी गटाचे विजेतेपद
येवला : पुढारी वृत्तसेवा
सी.आय.एस.सी.ई. स्कूल (झोन 2) आयोजित टेनिस स्पर्धा नुकत्याच पुणे येथील कॅम्प परिसरातील बिशप स्कूल येथे दिनांक 16 ते 18 ऑगस्ट या कालावधीत पार पडल्यात..सदर स्पर्धेत (झोन-2) या विभागातील पुणे,नासिक,औरंगाबाद,अमरावती,
जालना,जळगाव आणि नागपूर येथील विविध खेळाडूंनी सहभाग घेतला...
या स्पर्धेत लक्ष गुजराथी यांनी उपांत्यपूर्व सामन्यात बिशप कॅम्प पुणे शाळेतील खेळाडू रोहन क्षीरसागर यावर 6-0 तसेच उपांत्य सामन्यात प्रणित खंडेलवाल पुणे या खेळाडूंवर 8-1 असा विजय मिळवून अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला.
लक्ष यती गुजराथी याने सर्व्ह,व्हॉली आणि स्मॅश अश्या विविध बाबींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून पुण्यातील राष्ट्रीय खेळाडू अर्जुन कीर्तने या बरोबर तीन सेट मद्धे चाललेल्या अंतिम सामन्यात 7-4 ,7-3 अश्या फरकाने फरकाने सामना जिंकून स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आणि दिनांक 25 आणि 26 आगस्ट रोजी महाराष्ट्र टेनिस असोसिएशन मुंबई येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी लक्ष गुजराथी याची निवड झाली..
लक्ष याला बिशप स्कूल चे प्राचार्य जॉय एल्डबर्ग व डेवीस कप खेळाडू नितीन कीर्तने याच्या हस्ते गोल्ड मेडल व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले..
सदर खेळाडूचे संस्थेचे संस्थापक डॉ. राजेश पटेल डॉ.संगीता पटेल प्राचार्य सौ.शुभांगी शिंदे तसेच क्रीडाशिक्षक किरण कुलकर्णी,मोईज दिलावर आणि अभिलाष अहिरे,सर्व शिक्षक व शिक्षकवृंद कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात. लक्ष शहरातील नवभारत क्रीडा क्रीडा मंडळ क्रीडांगणावर प्रशिक्षक किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सतत सराव करतो. त्याच्या विजेतेपदावर नवभारत क्रीडा मंडळाच्या सर्व सभासदांनी अभिनंदन केले.