बनकर पाटील पब्लिक स्कूलमध्ये रक्षाबंधन उत्साहात.....
येवला : पुढारी वृत्तसेवा
विविध उपक्रमांसाठी नावजलेल्या अंगणगाव येथील बनकर पाटील पब्लिक स्कूलमध्ये भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला घट्ट बांधणारा रक्षाबंधन हा सन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध भारतीय सन हे या संस्कारांचे प्रतिक आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बरोबरच त्यांचे संस्कारही महत्वाचे असतात. हाच उदात्त हेतू समोर ठेऊन संस्थेचे अध्यक्ष प्रवीण बनकर व प्राचार्य पंकज निकम यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेमध्ये रक्षाबंधण निमित्ताने विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते.
यामध्ये पूर्वप्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी रक्षाबंधन संबंधी चित्र रंगविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली. विद्यार्थांनी आपल्या मनातील राखी कागदावर उतरवण रंगकामाची अदाकारी दाखविली. तसेच इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी राखी बनविण्याचे साहित्य उपलब्ध करून देत राखी बनविण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी विविध आकर्षक राख्या बनवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच बहिणीसाठी आभार मानणारे शुभेच्छा पत्र ही काही विद्यार्थ्यांनी तयार केले. शाळेचे कलाशिक्षक दिनेश कुमावत यांनी भव्य अशी प्रातिनिधिक राखी बनवत विद्यार्थ्यांमध्ये कलाविषयाबद्दल आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही भव्य राखी विद्यार्थ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली.
तसेच शाळेतील सर्व विद्यार्थीनींनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना राखी बांधत रक्षाबंधनाचा सन साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांनी एकमेकांना चॉकलेट व भेट वस्तू देत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्य पंकज निकम यांनी सर्वांनी या सणाचे महत्व सर्वाना समजावून सांगत विद्यार्थ्यांनी बनविलेल्या राख्यांचे निरीक्षण करून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.